Sushma Andhare: आरोपी दीपक काटे हा रेकॅार्डवरील गुन्हेगार, भाजपचा सक्रिय पदाधिकारी, बावनकुळेंचा निकटवर्तीय; प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी सुषमा अंधारे कडाडल्या
Sushma Andhare on Praveen Gaikwad : भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Sushma Andhare on Praveen Gaikwad : प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे हा रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. शिवाय तो भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी, खासदारकी, महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ला आणि काळं फासण्यात आल्याच्या घटनेवर त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी एक्स या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर तोफ डागत टीका केली आहे.
दरम्यान, प्रवीण गायकवाड हे काल (13 जुलै) अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे. या घटनेवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊतांसह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) July 13, 2025
या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका..
भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! #WorstPolitics pic.twitter.com/6wBm20Xxsu
पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांना दुग्धभिषेक
पंढरपूर येथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. तब्बल 51 लिटर दूध वापरून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आल. अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांना काळे फासल्याचे प्रकरण घडले. यानंतर पंढरपुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी करत गायकवाड यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत : जितेंद्र आव्हाड
पुरोगामी विचारधारेचे पाईक, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर आज जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी आता बोलायचच नाही, त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही, यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. पण प्रवीण दादा आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत. आम्ही प्रवीण दादांच्या सोबत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























