एक्स्प्लोर

CBSE Board : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने CBSE, ICSE आणि राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या ऑनलाईन परीक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने CBSE, ICSE आणि राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या ऑनलाईन परीक्षेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. संस्था त्यांचे काम करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशी याचिका ऐकून घेण्याचे कारण नाही. अशा याचिकांमुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो. याचिकाकर्त्याने सांगितले की, कोविडमुळे मुलांनी ऑनलाईन अभ्यास केला आहे. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मुलांचे मूल्यमापन करण्याचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय 

सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस तसेच सर्व राज्यांच्या बोर्डांनी दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठीची तयारी केली आहे. या टप्प्यावरून परीक्षा सुरळीत होण्यासाठी संबंधित प्रशासनाला त्यांचे काम करू देणे हे श्रेयस्कर आहे. जर कोणाला परीक्षेच्या तारखांवरून अथवा परीक्षेच्या आयोजनावरून काही तक्रार असेल तर संबंधित प्रशासनाला लेखी स्वरुपात कळविता यईल. 

विशेष परिस्थितीत अपवाद म्हणून परीक्षा ऑनलाईन घेतली जाऊ शकते. पण कायम ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्या ही मागणी करणे तसेच या मागणीला मंजुरी देणे योग्य ठरणार नाही. सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस तसेच सर्व राज्यांच्या बोर्डांच्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धत ही आदर्श पद्धत नाही. त्यामुळे परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तर, सीबीएसई टर्म 2 ची दहावी बारावीची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे.

ऑफलाईन परीक्षा योग्य नाही

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी दाखल केलेल्या याचिकेत सीबीएसईने 26 एप्रिलपासून बोर्डाच्या परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी केली असल्याचे म्हटले आहे. इतर काही राज्य मंडळांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संपूर्ण सत्रात मुलांनी ऑनलाईन अभ्यास केला. अनेक मुलांना संधीही मिळाली नाही. आता त्यांना परीक्षेसाठी शारीरिकदृष्ट्या विचारणे योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. त्यामुळे मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास सांगणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Leopard Attack: दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
Mumbai Crime Parksite: क्षुल्लक कारणावरुन वाद झाला, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला अन् पार्कसाईटचे 'महाराज'....
Nagarparishad Election BJP: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, ' माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, 'माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Leopard Attack: दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
Mumbai Crime Parksite: क्षुल्लक कारणावरुन वाद झाला, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला अन् पार्कसाईटचे 'महाराज'....
Nagarparishad Election BJP: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, ' माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, 'माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Maharashtra Live blog: मंगळवेढा नगरपालिकेमध्ये भाजप आमदार सोमनाथ अवताडेंचे बंधू बिनविरोध नगरसेवक
Maharashtra Live blog: मंगळवेढा नगरपालिकेमध्ये भाजप आमदार सोमनाथ अवताडेंचे बंधू बिनविरोध नगरसेवक
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Embed widget