Sudhir Mungantiwar : महायुतीतील आठ मंत्र्यांना नारळ, सुधीरभाऊंची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी? सामनातील सनसनाटी दाव्यांवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Politics : सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना मंत्रिपदी विधानसभा अध्यक्षपदी संधी दिली जाईल, असा दावा सामनामध्ये करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज मंत्र्यांना धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचे हि सामनात म्हटले आहे. दारम्यान, विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांना मंत्रीपदी संधी मिळणार असल्याचेही सामनामध्ये म्हटले आहे. त्यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधातच भूमिका घेतलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना मंत्रिपदी विधानसभा अध्यक्षपदी संधी दिली जाईल, असाही दावा हि सामनामध्ये करण्यात आला आहे.
बदल होणार असेल तर तो वेळेवर कळतो. पण....
दरम्यान, आता याच मुद्यांवरून राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा रंगत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर स्व:ता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. अशी कुठलीही चर्चा कोर कमेटी ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रीमंडळा बाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर होत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या काही बदल होणार असेल तर तो वेळेवर कळतो. पण सध्या असा काही बदल होईल अशा मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल मला सध्या काही माहीत नाही, पण सध्या असा काही फेरबदल होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. पुढे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही, असं मला वाटतं. असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
जी पक्षाची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल- राहुल नार्वेकर
या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, माध्यमांमधील बातम्यांवर आपला विश्वास नसून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे.त्यांनी पुढे सांगितले की पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारण्यासाठी तयार असून जी पक्षाची इच्छा असेल ती माझी इच्छा असेल, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांना डचू देणार आहे त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सगळे चांगले काम करत आहेत. मात्र पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























