Subi Suresh Passes Away : मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subi Suresh : मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन झाले आहे.
Subi Suresh : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता मल्याळम अभिनेत्री (Malayalam actress) सुबी सुरेश (Subi Suresh) यांचे निधन झाले आहे. सुबी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
सुबी सुरेश (Subi Suresh Passes Away) यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवासांपासून यकृतासंबंधित (Liver Disease) आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर कोची येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्या निधनाने चाहत्यांकडून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. सुबी यांना नृत्याची आवड असल्याने त्यांनी नृत्यांगणा म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक विनोदी कार्यक्रमात त्यांनी काम केलं.
View this post on Instagram
सुबी सुरेश यांच्याबद्दल जाणून घ्या...
सुबी सुरेश या मल्याळम मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांची विनोदी शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये त्यांनी जास्त काम केलं आहे. 'कुट्टी पट्टलम' (Kutty Pattalam) हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम. नाटकांसह त्या 'गृहनाथन', 'Thaksara Lahala', 'एलसम्मा एन्ना आंकू' या लोकप्रिय सिनेमांतदेखील झळकल्या आहेत.
सुबी सुरेश यांनी 'सिनेमाला' (Cinemala) या मल्याळम कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे. 2006 साली 'कनस सिम्हासनम' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण 'कुट्टीपट्टलम' (Kutty Pattalam) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी हस्बैंड, 'एल्सम्मा एना अंकुट्टी' (Elsamma Enna Aankutty) अशा सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
सुबी (Subi Suresh Passes Away) यांच्या निधनानंतर त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीनने पोस्ट केली आहे की,"एका गोष्टीचा शेवट झाल्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात होत असते. पुन्हा भेटू...धन्यवाद". या पोस्टवर मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह चाहतेदेखील शोक व्यक्त करत आहेत.
Shocking 😳
— AB George (@AbGeorge_) February 22, 2023
RIP Subi Suresh... pic.twitter.com/KIGx2V1EuC
महत्त्वाच्या इतर बातम्या :