(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
Stree 2 Box Office Collection : चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या एक महिन्यानंतरही 'स्त्री-2' चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे.
Stree 2 Box Office Collection Day 35 : चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या एक महिन्यानंतरही 'स्त्री-2' चा (Stree 2 Movie) बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. रिलीजच्या 35 दिवसानंतरही भारतातच नाहीतर वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 'स्त्री-2' ची जोरदार कमाई सुरू आहे. आता चित्रपट वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 800 कोटींचा गल्ला जमवला आहे.
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार 'स्त्री 2' ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 34 दिवसांत 798.75 कोटी रुपये कमावले होते. आता 35 व्या दिवसाच्या कमाईचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 35 व्या दिवशी 1.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर, एकूण 800.95 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
आमिर खानच्या 'पीके'ला दिली मात
'स्त्री 2' ने जगभरातील कमाईचा 800 कोटींचा आकडा पार करताना अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने आमिर खानच्या 'पीके' या हिट चित्रपटालाही मात दिली आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात 792 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. आता 'स्त्री 2' हा रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'चा कमाईतील विक्रम मोडेल का, याकडे सिनेवर्तुळाचे लक्ष लागले आहे. 'अॅनिमल'ने जगभरात 915 कोटींची कमाई केली होती.
'स्त्री-2' आता ओटीटीवर
नुकतीच स्त्री-2 च्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 'स्त्री 2' मध्ये श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत. त्याशिवाय, तमन्ना भाटिया, अक्षय कुमार आणि वरुण धवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. स्त्री-2 नंतर आता प्रेक्षकांना स्त्री-3 ची उत्सुकता लागली आहे. स्त्री-3 मध्ये अक्षय कुमारची महत्त्वाची भूमिका प्रेक्षकांना दिसण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
दरम्यान, स्त्री-2 हा चित्रपट रिलीजच्या पाचव्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. या चित्रपटाने बाहुबली (11.78), तानाजी (10.41 कोटी), केजीएफ चॅप्टर 2 (10.25), 3 इडियट्स (9.6), जवान (9.47), दृश्यम (8.98), दंगल (8.95), पठाण (8.45), भूल भुलैयाला मागे टाकले. 2 (8.18), बधाई हो (8) आणि पद्मावत (7.54) या चित्रपटांना मागे सारले आहे.