एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : "स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित"; जागतिक महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची लक्षवेधी पोस्ट

Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Sonalee Kulkarni On International Womens Day : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे. 

सोनालीने काय लिहिलं आहे? 

सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तिने खास फोटो शेअर करत लिहिलं आहे, "भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी 'मराठ्यांची राणी' असे संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत". 

सोनालीने लिहिलं आहे,"अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री. आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंना मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने पुढे लिहिलं आहे, "मी हा जागतिक महिला दिन त्यांना आणि त्यांच्यासारख्या स्त्रियांना समर्पित करते. ज्या केवळ स्वत:साठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात". सोनालीच्या या पोस्टवर स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूपच सुंदर, जय भवानी, जय शिवराय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'बद्दल जाणून घ्या...

सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा डॉ. जयसिंहराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. राहुल जनार्दनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमात सोनाली ताराराणींच्या भूमिकेत झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Mogal Mardini Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत; अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

महत्त्वाच्या बातम्या

15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget