एक्स्प्लोर

Tomato Price : टोमॅटो दरात घसरण, मोडनिंबमधून होणारी निर्यात बंद, पाकिस्तानात टोमॅटो निर्यात करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब (Modnimb) ही मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहारसह देशभरातील विविध राज्यात टोमॅटो पाठवले जातात. मात्र, सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने मोडनिंबच्या बाजारपेठेतून होणारी निर्यात बंद झाली आहे. सध्या देशात टोमॅटोला भाव नसल्यानं जिथं 500 रुपये किलोने टोमॅटो विकला जातो, त्या पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) या देशांच्या सीमा उघडण्याची मागणी आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

उत्पादन खर्च वाढला असताना अपेक्षीत दर मिळत नाही

सध्या टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादन चांगल असतना दर मात्र, योग्य मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सध्या टोमॅटोला  किलोला 8 ते 10 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, उत्पादन खर्च पाहता हा दर परवड नाही.  त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच सध्या सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्याचा फटका देखील टोमॅटो उत्पादनावर झाला आहे. पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. राज्यातील  सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातून असंख्य शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी मोडनिंब बाजारपेठेत येत असतात. मोडनिंब ही मोठी बाजारपेठ असून दिल्ली राजस्थान, गुजरात, कोलकाता अशा असंख्य ठिकाणी माल पाठवण्यासाठी व्यापारी या ठिकाणी येतात. परंतू, सध्या माल मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा रुपयांचा खर्च येत आहे. तर आठ ते दहा रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आर्थिक फटका बसत आहे. 

टोमॅटो निर्यातीसाठी केंद्र सरकार मदत का  करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल

सध्या देशात टोमॅटोला चांगला दर मिळत नाही. मात्र, बाहेरच्या देशात टोमॅटोला सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. असे असतानाही टोमॅटो निर्यातीसाठी केंद्र सरकार मदत का  करत नाही? असा सवाल टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि व्यापारी करत आहेत. सध्या पाकिस्तानात पूरस्थिती असल्यानं इथे कोणताच शेतमाल पिकत नाही. सध्या पाकिस्तान टोमॅटोला 500 रुपये किलो एवढा दर मिळत असताना केंद्र सरकारने देशातील टोमॅटो बाहेर पाठवण्यास परवानगी द्यावी अथवा या देशातील बॉर्डर उघडाव्यात अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख प्रशांत गिड्डे यांनीही केली आहे. केंद्र सरकारनं टोमॅटो निर्यातीस परवानगी दिल्यास अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादकांना चार पैसे मिळू शकतील असा दावा टोमॅटो अडती आणि व्यापारी करत आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget