एक्स्प्लोर

Solapur Crime : पत्नीसह मुलाची हत्या करून शिक्षकाने स्वतः केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर हादरलं

Solapur Crime : याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, अतुल मुंडे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सोलापूर : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका शिक्षकाने पत्नीसह मुलाचा निर्घृण खून (Murder) करून स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोलापूरच्या (Solapur) बार्शी शहरात ही हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अतुल मुंडे असे पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असल्याचे कळत आहे. विशेष म्हणजे दोघेही मुंडे पती-पत्नी हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, अतुल मुंडे यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. तर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एका शिक्षकाने कुटुंबातील सदस्यांची हत्या करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. तर त्यांच्या पत्नी देखील शिक्षका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, अतुल मुंडे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. परंतु, सर्वच बाजूने या घटनेचा तपास करत आहे. 

नेमकं काय घडलं? 

बार्शीत घडलेल्या घटनेत अतुल सुमंत मुंडे (वय 40), तृप्ती अतुल मुंडे (वय 35) ओम सुमंत मुंडे (वय 5) या तिघांचा मृत्यू झालंय. प्राथमिक माहितीनुसार, अतुल मुंडे यांनी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेतं आत्महत्या केली.  अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. अतुल मुंडे यांनी हे कृत्य का केलं याबाबतीत पोलीस तपास करीत आहेत.

परिसरात खळबळ...

शिक्षक मुंडे दांपत्य मागील काही वर्षांपासून बार्शी शहरात राहत होते. मात्र, आज अतुल  मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, पोलीस देखील घटनास्थळी पोहचले आहेत. सोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील  घटनास्थळी आले आहेत. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. पोलीस आता सर्वच बाजूने तपास करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

ST Bus Accident : नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण! एसटी बसचे चाक मागचे निखळले, बस उलटली अन् थोडक्यात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget