एक्स्प्लोर

ST Bus Accident : नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण! एसटी बसचे चाक मागचे निखळले, बस उलटली अन् थोडक्यात...

सोलापुरातील उळे-कासेगाव येथे हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवलाय.  अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत.

सोलापूर :  सोलापूर-धुळे राष्ट्रीय  महामार्गावरुन (Solapur- Dhule Highway) धावणाऱ्या एसटी बसला (ST Bus) अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे  चाकं निखळले.  या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवलाय.  अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून येथून  ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव  येथे अचानक  एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात  झाला. ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.सर्व जखमींना जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.    

 डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटात झाला अपघात

सोलापूर  डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा अपघात झाला आहे.  नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात आला आहे.

आठवड्याभरातील दुसरी घटना

एसटीच्या अपघाताची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. 21 नोव्हेंबर रोजी (मंगळवारी)  दुपारी सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते. सोलापूर - तुळजापूर रोडवरील कासेगाव जवळ हा अपघात झाला होत. या एसटी बस मधील प्रवासी पुणे कर्नाटक आणि मराठवाड्यातील होते.  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.  या अपघाताने काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मुक्का मार लागला होता. 

एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील (Gadchiroli) लालपरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होता. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला तरी या एसटीचा (ST) चालक ही बस भरधाव वेगाने चालवत होता. सर्वसामान्यांचं प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे, लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणं प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget