एक्स्प्लोर

सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 

सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. 28 जूनपासून तांत्रिक कारणामुळे बंद असलेली सोलापूर मुंबई सेवा पुन्हा सुरु करण्याचा स्टार एअरने निर्णय घेतला आहे.

Solapur Mumbai air service : सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. 28 जूनपासून तांत्रिक कारणामुळे बंद असलेली सोलापूर मुंबई सेवा पुन्हा सुरु करण्याचा स्टार एअरने निर्णय घेतला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध असणार आहे. 

ऑनलाइन तिकीट बुकिंगला सुरुवात

2 ऑगस्टपासूनच्या प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगला सुरुवात देखील झाली आहे. विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, उद्योजक, रुग्ण आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र तिकिटाच्या दरात काहीशी वाढ झाली असल्याची माहिती मिळत आहे. 

सोलापूर विमानतळावरून 28 जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून 2 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 28  जून 2026 पासून स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आली होती. या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. सोलापूरकरांनी ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोलापूर ते मुंबई विमानसेवा तात्काळ सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. मंत्री गोरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून स्टार एअरलाईन कंपनीने 2 ऑगस्ट पासून सोलापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे ऑनलाइन बुकिंग काउंटर सुरू करून 2 ऑगस्ट पासूनच्या सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई जोडणी अत्यंत महत्त्वाची : पालकमंत्री जयकुमार गोरे 

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई जोडणी अत्यंत महत्त्वाची आहे. विमानसेवा बंद झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सोलापूरकरांच्या अडचणीची दखल घेऊन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्परतेने पावले उचलली. त्यांच्या या पाठबळामुळे सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होत असून, सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर स्टार एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत. 

आगमन व प्रस्थान कधी?

सोमवार आणि बुधवार - आगमन सायंकाळी १७:१०(५.१०) वाजता आणि प्रस्थान सायंकाळी 17.40 (5.40) वाजता.
शुक्रवार आणि रविवार - आगमन दुपारी १३:३०(१.३०) वाजता आणि प्रस्थान दुपारी14 (2) वाजता.
    विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार असून त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget