एक्स्प्लोर

Solapur News : सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, भीम आर्मीचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

Solapur News : सोलापुरात भीम आर्मीच्य पदाधिकाऱ्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर : सोलापुरच्या (Solapur) पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय असं या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.  सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

चंद्रकांत पाटील हे पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर यावेळी कंत्राटी भरती विरोधात या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी देखील केली. तर त्याने घोषणाबाजी तर काळे झेंडे दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. 

चंद्रकांत पाटील झाली होती शाईफेक

याआधी पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं होतं. तर ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला होता भंडारा

काहीच दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शासकीय विश्रामगृहामध्ये भंडारा उधळण्यात आला होता. धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन हा भंडारा विखे पाटलांवर उधळला गेला होता. तर विखे पाटलांवर ज्याने भंडारा उधळला होता, त्या शेखर भंगाळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 

त्याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. कोणत्याही प्रकारे आंदोलन होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली होती. परंतु तरीही भीम आर्मीच्या या पदाधिकाऱ्याने मार्ग काढत कंत्राटी पद्धतीचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील हे आता शासकीय विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कंत्राटी भरती प्रक्रियेचा राज्यभरातून विरोध करण्यात येत आहे. त्याचाच विरोध करत या पदाधिकाऱ्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा : 

Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलले, नेमकं काय आहे ठोस कारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Embed widget