माढा तालुक्यातील रस्ते घेणार मोकळा श्वास, अभिजीत पाटलांच्या पाठपुराव्याला यश, प्रमुख रस्त्यांना मिळाला जिल्हा मार्गाचा दर्जा
माढा तालुक्यातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. कारण माढा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील (Abhijit Patil ) यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
Abhieet Patil : गेल्या अनेक दिवसांपासून माढा (Madha) तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचं चित्र दिसत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांकडून वारंवार मागणी होताना दिसत आहे. अनेक नागरिक लोकप्रतिनीधींसह विविध पक्षांच्या नेत्यांकडे यासंदर्भात मागणी देखील करत होतो. अखेर माढा तालुक्यातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. कारण माढा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील (Abhijit Patil ) यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. माढा तालुक्यातील सुमारे 209 किलोमीटरच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं माढा तालुक्यातील या रस्त्यांचा विकास करणे तसेच त्यांना लवकरात लवकर निधी प्राप्त करुन घेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
माढा तालुक्यातील 209 किलोमीटरच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा
माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करत होते. आज अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. माढा तालुक्यातील 209 किलोमीटरच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या आदेशाने माढा तालुक्यातील सुमारे 208.2 किलोमीटरचे रस्ते हे दर्जोनित करून त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं रस्त्यांना लवकरात लवकर निधी प्राप्त करुन घेण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं ज्या रस्त्यांची प्रलंबितकामे आहेत, ती तात्काळ पूर्ण होणार आहेत. अबिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळं त्यांचे माझा तालुक्याच्या नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

रस्त्यांची अवस्था वाईट असल्यामुळं वाहतुकीला अडचणी
माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील हे कायम चर्चेत असतात. शेती मातीच्या प्रश्नावर सातत्याने ते आवाज उठवत असतात. विधीमंडळात देखील त्यांनी विविध प्रश्न लावून धरले होते. रस्ते, वी, पाणी या प्रश्नांसह मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न देखील त्यांनी विधानस,भेत मांडला होता. माढा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचं बागायती क्षेत्र आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात फळांच्या बागा देखील आहे. त्यामुळं दळणवळणाची साधणे चांगली असणे गरजेचं आहे. रस्त्यांची अवस्था वाईट असल्यामुळं वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळं नागरिक वारंवार रस्त्यांच्या संदर्भात लोकप्रतिनिधी अभिजीत पाटील यांच्याकडे मागणी करत होते. अभिजीत पाटील यांनी देखील या रस्त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा केला आहे. अखेर 209 किलोमीटरच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:


















