Solapur : सोलापुरात हिंदु जन आक्रोश मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक, एक व्यक्ती ताब्यात, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई होणार?
Solapur Hindu Jan Akrosh Morcha : सोलापुरात हिंदु जन आक्रोश मोर्चादरम्यान तोडफोडीची घटना घडली आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Solapur Hindu Jan Akrosh Morcha : सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या तोडफोड प्रकरणी एका व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या या तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाषणादरम्यान जर कोणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावरही रितसर कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि टी. राजा सिंग (BJP MLA T Raja Singh) यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोलापुरात शनिवारी हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या दरम्यान सोलापुरात काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलं आहे. मोर्चाच्या वेळेस पोलिसांनी या परिसरात कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे फुटेज पाहून आणखी आरोपी निश्चित केले जाणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी आमदार नितेश राणे आणि टी. राजा सिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावलेली होती अशी माहिती समोर येत आहे. भाषणादरम्यान जर कोणी आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावरही रीतसर कारवाई केली जाईल अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून नितेश राणेंची टीका
सोलापुरातल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून टीका करताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहिल."
ही बातमी वाचा: