Solapur News: महापालिका जिल्हा परिषद अन् नगरपरिषदा निवडणुकांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात घडामोडींना वेग, भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, विरोधक म्हणाले 'फरक...'
Jaykumar Gore: सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सध्या पक्षाने सुरू केल्याचे चित्र आहे.

सोलापूर: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठा धमाका केला असून काल रात्री सोलापूर शहरातील उपमहापौर आणि अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाल्याने पालकमंत्री गोरे यांनी डबल धमाका केला आहे. हे प्रवेश देताना पालकमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अजितदादा गटाला आहे दे धक्का दिला आहे. यातूनच सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी (Municipal Zilla Parishad and Municipal Council elections) स्वबळावर लढण्याची चाचपणी सध्या पक्षाने सुरू केल्याचे चित्र आहे.
Solapur News: आम्ही सध्या सत्ताधारी नव्हतो आणि विरोधकही नव्हतो
आपल्याला पक्षात किंमत नव्हती आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या विचारानंतर भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सांगितले आहे. याच पद्धतीची मानसिकता दुसरे उपमहापौर पद्माकर काळे आणि भाजप प्रवेश करणाऱ्या अनेक माझी माजी नगरसेवकांची आहे, पण खरा धमाका झाला तो सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीने .. काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत तात्या माने तर माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे दोन्हीही मुलगी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही सध्या सत्ताधारी नव्हतो आणि विरोधकही नव्हतो अशी अवस्था झाल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले. कार्यकर्ते पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने आणि पक्ष विचारात घेत नसल्याने आम्हाला अखेर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली अशी खंत दिलीप माने यांनी व्यक्त केली.
Solapur News: परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये भाजपाला खूप मोठी ताकद
माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूर महापालिकेला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला मोठा फायदा भाजपाला मिळू शकणार आहे. याच पद्धतीने मोहोळच्या दोन्ही माजी आमदारांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती एकतर्फी जिंकणे भाजपाला सोपे जाणार आहे. माझ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे सध्या आजारपणामुळे अमेरिकेत उपचार घेत असले तरी गेल्या वेळी माढ्यातून विधानसभा निवडणूक लढविलेले त्यांचे जेष्ठ पत्र रणजीत सिंह शिंदे आणि दुसरे पुत्र विक्रम शिंदे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दाखवली होती. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला असलेले सर्व माजी आमदार यांची परिस्थिती एकसारखीच असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावे लागत असल्याचेही दिलीप माने यांनी सांगितले आहे. या प्रवेशामुळे सोलापूर माढा मोहोळ या तिन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये भाजपाला खूप मोठी ताकद मिळाली आहे. याचा फटका माढा आणि मोहोळ मध्ये अजित पवार गटाला बसला आहे. असे पक्षप्रवेश सुरूच असतात पण यामुळे कोणताही फरक पडणार नसल्याचा दावा माढा लोकसभेचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे.
Solapur News: अनेक नेते भाजपच्या प्रवेशासाठी सातत्याने पालकमंत्र्यांशी संपर्कात
इतर अजून सुरुवात असून लवकरच संपूर्ण जिल्हा भाजपमय झालेला दिसेल अजून अनेक नेते भाजपच्या प्रवेशासाठी सातत्याने पालकमंत्र्यांशी संपर्क साधत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी सुरू केलेल्या या इकमिंगमुळे विरोधी पक्ष सोबत मित्र पक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत. सध्या सुरू असलेले इन्कमिंग हे महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी असल्याचे वरकरणी दिसत असले तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नजर पुन्हा एकदा सोलापूर आणि माढा लोकसभा जिंकण्यावर दिसत आहे. त्यामुळेच काल झालेल्या बैठकीच्या वेळी भाजपचे माढ्यातील माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते.























