एक्स्प्लोर

Solapur Crime News : सकाळी उठून आंघोळीला बाथरुमध्ये गेला अन्..., वडिलांनी दरवाजा वाजवला प्रतिसाद आला नाही म्हणून दार तोडलं; दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसला

Solapur Crime News : मंद्रूप या गावामध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

सोलापूर: सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात मंद्रूप येथे विद्यार्थ्याने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या विनायक नागनाथ कुंभार या विद्यार्थ्याने घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली, याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेलं नाही. मंद्रूपमधील विनायक नागनाथ कुंभार हा विद्यार्थी लोकसेवा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. बारावी परीक्षेचे आत्तापर्यंत चार पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांने अचानक आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या गावामध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय 17, रा. कुंभार गल्ली मंद्रूप) असं विद्यार्थ्यांचंं नाव आहे. विनायक हा सकाळी उठून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. त्यावेळी घरातील बाथरूममधील खिडकीला टॉवेल बांधून त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. मुलगा बाथरूममधून बाहेर का येत नाही म्हणून वडिलांनी दरवाजा तोडला. त्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी तातडीने मुलाने मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. 

विनायक हा मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत चार पेपर त्यांनी दिले होते. त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी वडील नागनाथ कुंभार यांनी मंद्रूप पोलिसात खबर दिली आहे. अधिक तपास ग्रेड पोलिस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव हे करत आहेत.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget