एक्स्प्लोर

रात्री लागली हळद अन् पहाटे नवरीने उचलंल टोकाचं पाऊल, बोहल्यावर चढण्यापूर्वीच...

हळदीचा कार्यक्रम  पार पडल त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. पहाटे 5 च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.

सोलापूर बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या (Solapur Bride Suicide)  करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. हळदीचा कार्यक्रम  पार पडल त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. पहाटे 5 च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.

लग्नाच्या बोहुल्यावर चढण्यापूर्वी उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडलाय. सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील काही तरुण सालिया हिचे लग्न होऊ नये यासाठी त्रास देत होते. तसेच होणाऱ्या नवरदेवास आणि मुलीच्या वडिलांना देखील फोन करून धमक्या देत होते. गावातील समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख ह्या तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केलाय. 

गळफास घेतं आपले जीवन संपवले

सालिया शेख हिचा विवाह आज 18 डिसेंबर रोजी विजयपूर येथील तरुणाशी होणार होता. त्यासाठी कुटुंबाने संपूर्ण तयारी देखील केली होती. काल रात्री घराजवळ हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. त्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.

नवऱ्यास दिली होती जीवे मारण्याची धमकी

समीर शेख आणि सलमान शेख या तरुणांच्या विरोधात सालिया शेख हिने स्वतः पोलिसात तक्रारी अर्ज देखील दिला होता. समीर आणि सलमान हे लग्न केल्यास होणाऱ्या नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. तसेच समीर सोबत माझे संबंध असल्याचे सांगून बदनामी करत असल्याचा उल्लेख पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सालिया हिने केला आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधीत तरुणांना तात्काळ अटक करत कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीचे वडीलांनी केलीय.

आज होणार होता विवाह

 सालियाचा आज सोमवारी  (18 डिसेंबर) विवाह होता. त्यामुळे शेख  कुटुंबात रविवारी (17 डिसेंबर) हळदी समारंभ धुमधडाक्यात पार पडला.  सालियाचा आत्महत्येची बातमी समोर आली अन् आनंदाचा सोहळा दु:खात बुडाला. उच्च शिक्षित असलेल्या  सालियाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.

हे ही वाचा :

Beed Crime News : गावातील प्रेमप्रकरण, दोघेही लॉजवर गेले अन् भयंकर घडलं; तिला संपवून त्याने स्वतःलाही संपवलं

                

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Laxman Hake : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
ओबीसींच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget