सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई, पुणे तसेच दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांना ‘पाथ’ न मिळाल्याने त्या ठिकठिकाणी थांबत थांबत पुढे सरकत होत्या. सिद्धेश्वर एक्सप्रेस साडेसात तास उशिराने सोलापूरला दाखल झाली

सोलापूर : मुंबई-सोलापूर वंदे भारत (Vande bharat) ट्रेनला सोमवारी सायंकाळी किरकोळ अपघात झाला, पुणे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनचा एक डबा रुळावरुन घसरल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याच्या किरकोळ अपघाताचा मोठा फटका सोलापूरकडे येणाऱ्या रेल्वे (Railway) वाहतुकीला बसला आहे. विशेष म्हणजे, सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर सोलापूरकडे (Solapur) जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी देखील ही वाहतूक विस्कळीत असल्याचं पाहायला मिळते. सोलापूरकरांची हक्काची असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेससह अनेक गाड्या तब्बल 6 ते 7 तास उशिराने सोलापूरला पोहोचल्याने रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला.
मुंबई, पुणे तसेच दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांना ‘पाथ’ न मिळाल्याने त्या ठिकठिकाणी थांबत थांबत पुढे सरकत होत्या. सिद्धेश्वर एक्सप्रेस साडेसात तास उशिराने सोलापूरला दाखल झाली, तर उद्यान एक्सप्रेस सुमारे पाच तास उशिराने पोहोचली. चेन्नई, कोईमतूर, नागरकोईल, तिरुपती मार्गावरील अनेक गाड्यांनाही 7 ते 8 तास विलंब झाला होता. गाड्यांची स्थिती अनेक गाड्यासह ते सात तास उशिराने पोहोचल्या तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.
सोलापूर-मुंबई 28 एप्रिल रोजीची वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तर, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूरु उद्यान एक्सप्रेस यासारख्या प्रमुख गाड्या कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी आणि अंबरनाथ स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलं.
अपघाताची चौकशी केली जाणार
मुंबईवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा अपघात पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना झाला होता. त्यामुळे, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणाऱ्या ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा रुळावरुन घसरलेला डबा पूर्ववत करण्याचं काम आज सकाळपर्यंत सुरु होतं. मुख्य लाईनवरून ट्रेनचे इंजिन पुढे जात असताना 15 नंबरच्या डब्याने ट्रॅक बदलला नसल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग






















