मुंबई भांडवलदारांची नाही, तर कामगार आणि कष्टकऱ्यांची; शेकाप आमदार जयंत पाटलांचा टोला
Solapur News Update : राज्यात सुरु असलेले राजकारण अत्यंत घाणेरडे असून हे सर्व पाहायला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख नाहीत हेच बरे आहे, अशा भावना शेकाप नेते आमदार भाई जयंतराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
सोलापूर : मुंबई भांडवलदारांच्या मालकीची नसून मुंबईला कामगार आणि कष्टकऱ्यांनी मोठे केले आहे. राज्यपालांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी असून त्यांचा महाराष्ट्राचा अभ्यास कमी पडतोय. आम्ही याचा निषेध करतो, अशी टीका शेकाप नेते आमदार भाई जयंतराव पाटील यांनी केली आहे. सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण अत्यंत घाणेरडे असून हे सर्व पाहायला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख नाहीत हेच बरे आहे, अशा भावना देखील पाटील यांनी व्यक्त केल्या.
शेकापचे नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या सांगोला येथील सुत गिरणीवर आदरांजली सभेचे आयोजन केले होते. यासाठी शेकापचे भाई जयंत पाटील , भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान अवताडे, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयंतराव पाटील म्हणाले, "सांगोला सारख्या दुष्काळी भूमीत नंदनवन करताना भाई गणपतराव यांना आपला पक्ष आडवा आला नाही. शिवाय आपल्या तत्वांना मुरड घालावी लागली नाही. कोणत्या मंत्र्यांची लाचारी करावी लागली नाही, याबरोबरच पक्ष बदलावा लागला नाही. त्यांनी जी कामे करून घेतली, जो निधी मिळवला तो विधानसभेत भांडून मिळवला. पण आज विकासाचे नाव घेऊन तत्वे बदलणे, पक्ष बदलणे, मंत्र्यांची लाचारी करणे हे चित्र महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
"मुंबई भांडवलदारांच्या मालकीची नसून मुंबईला कामगार आणि कष्टकऱ्यांनी मोठे केले आहे. यापूर्वीही मुरारबाजी देसाई यांनी मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, येथील लोकांच्या एकजुटीमुळे ते शक्य झाले नाही. यापुढीहे ते कोणाला शक्य होणार नाही, असे जयंतराव पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्प का बसलात? आनंदी दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचा शिंदेंना सवाल
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना शपथविधीचाच विसर पडला? सुधीरभाऊंचा कॅबिनेट मंत्री उल्लेख असलेल्या फलकाचे केलं अनावरण!