दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्प का बसलात? आनंदी दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचा शिंदेंना सवाल
Kedar Dighe On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बोलताना आनंदी दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे.

Kedar Dighe On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बोलताना आनंदी दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. वेळ आली की सांगेन असं म्हणाले आहेत. आता यावरूनच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे यांना सवाल केला आहे. दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्पा का बसलात? सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते ट्वीट करून असं म्हणाले आहेत.
केदार दिघे ट्वीट करून म्हणाले की, ''मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?''
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?
— Kedar Dighe (@KedarDighe1) July 30, 2022
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''आणखी काही गोष्टी माझ्या आणि त्यांच्यातल्या आहेत. त्या मी आज सांगणार नाही. मात्र जसं समोरून बोलणं होईल, तसं मलाही बोलावं लागेल. मलाही भूकंप करावा लागेल. धर्मवीरांच्या बाबतीत देखील जे-जे काही झालं आहे, सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलं आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनात देखील ज्या काही घटना घडल्या आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. योग्यवेळी नक्की बोलेल.''
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाण्यात केदार शिंदे यांचं स्थान बळकट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राजकरणात तितके सक्रिय नव्हते, जितके शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर ते दिसत आहेत. अशातच आता ठाण्यात ते शिवसेनेचे मोठे नेते म्हणून पुढे येणार का? हे नजीकच्या काळात कळू शकेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: औरंगाबादच्या शिवसेनेच्या लोकसभा जागेवर 'भाजप'चा दावा
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना शपथविधीचाच विसर पडला? सुधीरभाऊंचा कॅबिनेट मंत्री उल्लेख असलेल्या फलकाचे केलं अनावरण!























