Sadabhau Khot: माझ्या नादाला लागला तर तुमच्या xxxमध्ये नांगराचा फाळ घालीन; सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, धमक्या देणाऱ्या गोरक्षकांना थेट इशारा
Sadabhau Khot: लई गडी भेंडाळले, माझ्या नादाला लागला तर असं म्हणत सांगोल्यामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, धमकी देणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी यावेळी इशारा दिला आहे.

सांगोला: माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय अशा भाषेत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट गोरक्षकांना इशारा दिला. मात्र भाषणाच्या ओघात बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. आजवर शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केली नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. असे असताना काही लोकं गाया अडवतात मी त्याला विरोध केला तर मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत, मात्र माझ्या नादाला लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणलेला आहे, तो नांगराचा फाळ तुमच्या xxxमध्ये घालीन, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत
शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाई बाजारामध्ये विकायला आणलेली नाही. हा हजारो वर्षांचा अतिहास आहे. मी तुम्हाला विचारतो कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या xxx नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा,असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सांगोल्यामध्ये जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांना येत असलेल्या धमक्यांना सदाभाऊ खोत यांनी थेट गावरान भाषेत उत्तर दिलं. मात्र हे उत्तर देताना सदाभाऊंची जीभ घसरली .
सदाभाऊ खोत यांना धमक्या
सांगोल्यात जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वाखाली सांगोल्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपल्याला येत असलेल्या धमक्यांना सदाभाऊ खोत यांनी थेटच गावरान भाषेत उत्तर दिले. मात्र हे उत्तर देताना सदाभाऊंची जीभ घसरली, यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लई गडी भेंडाळले, माझ्या नादाला लागला तर असं म्हणत सांगोल्यामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, धमकी देणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी यावेळी इशारा दिला आहे.#sadabhaukhot #sangola #gorakshak pic.twitter.com/cGiiD3Ejc8
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 22, 2025
























