एक्स्प्लोर

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावाने पंढरपुरात बोगस बुकिंग, फेक संकेतस्थळ काढून भामट्याचं कृत्य

Pandharpur : भामट्याने  बोगस संकेतस्थळ काढून थेट मंदिर प्रशासनालाच टोपी घालण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सोलापूर : एका अज्ञात भामट्याने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात भामाट्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे नं 59 येथे श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास आहे. या भक्त निवासामध्ये खोली बुकींग साठी https://yatradham.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने काऊंटर बुकिंग सुविधा देखील आहे.

या भामट्याने श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाचे नावाने https://shrivitthalrukminibhaktaniwas.in/ असे बोगस (फेक) संकेतस्थळ (वेबसाईट) तयार केली .  त्यावरील मो. 9045033719 वरून खोल्या बुकिंग केल्या जातात असे सांगून भाविकांचे पैसे स्वीकारले. या भामट्याने भाविकांना  त्याची पावती देखील दिली आहे.  

साधारण 6 ऑक्टोबरपासून अशा भाविकांनी भक्तनिवास येथील दुरध्वनीवर संपर्क केला असता हा प्रकार उघडकीस आला. काही भाविक त्याच्याकडे केलेल्या बुकिंग नंतर भक्तनिवास येथे प्रत्यक्ष वास्तव्यास आले असता त्यांची फसवणूक झाल्याचं मंदिर प्रशासनाला समजलं. 

आता इतर भाविकांनी फसवणूक होऊ नये, तसेच फसवणूक झालेल्या भाविकांना न्याय देण्याच्या दॄष्टीने या भामाट्याच्या विरोधात पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता  पंढरपूर शहर पोलिस व https://cybercrime.gov.in/  यांचे कडे मंदिर समितीच्या वतीने लेखी तक्रार दिल्यानंतर तपासला सुरुवात झाली आहे . 

तरी भाविकांनी यापुढे मंदिर समितीच्या भक्त निवास येथे राहण्यासाठी  https://yatradham.org  या अधिकृत  संकेतस्थळावरून किंवा ऑफलाईन पद्धतीने खोली काऊंटर बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashish Shelar Vs MVA मतदारयादी घोळावरुन धार्मिक राजकारण,'दुबार मतदार',ठाकरे वि. शेलार Special Report
Zero Hour Phaltan Case : फलटण डॉक्टर प्रकणावरुन अंधारेंचा एल्गार, तर राष्ट्रवादीत चाकणकर vs ठोंबरे
Zero Hour Sarita Kaushik : मतदार यादीतला घोळ, राजकारण तापलं; एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Shaina NC : रोहित पवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात हजारो बोगस मुस्लिम मतदार
Zero Hour Sandeep Deshpande : दुबार मतदाराला कोणतीही जात नसते;संदीप देशपांडेंचा भाजपला प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Embed widget