एक्स्प्लोर

पंढरपुरात दुसऱ्यांदा पूरस्थिती, उजनी, वीर धरणातून मोठा विसर्ग, चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Pandharpur Rain Update : चंद्रभागा नदीने धोक्याची पातळीवर ओलांडली असून नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे राज्यातील जलाशयात कमालीची वाढ झाली आहे. पंढरपूरमध्येही मुसळधार पाऊस (Pandharpur Rain Update) बरसत असल्याने येथील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये दुसर्‍यांदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर दुसऱ्यांदा पूर परिस्थिती ओढावली आहे. चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने नदीकाठच्या अंबिकानगर व व्यास नारायण वसाहतीमधील सुमारे 35 ते 40 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

उजनी, वीर धरणातून मोठा विसर्ग

या भागातील घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने प्रशासनाने रात्रीपासून नागरिकांना हलविण्यास सुरुवात केली असून पाणी पातळी अजूनही वाढली तरी प्रशासन त्या दृष्टीने तयारी करत आहे.  सध्या उजनी धरणातून 81 हजार 600 तर वीर धरणातून 43 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या चंद्रभागा नदीत एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सुरु आहे. 

नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले 

आज दुपारपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अजूनही पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने उजनीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनीतून अजूनही ज्यादा पाणी सोडले जाऊ शकणार असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. वीर धरणाचे पाणी थोडे कमी केल्याने पंढरपूरला दिलासा मिळाला असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सातत्याने पूर्ण नियंत्रणासाठी दोन्ही धरणाच्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत.

राज्यातील धरणसाठा 75 टक्क्यांच्या पार

दरम्यान, राज्यातील धरणांमधील साठा 75 टक्क्यांच्या पार गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांसोबतच शेतकरी वर्गाला देखील दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी याचवेळी राज्यात पाणीसाठा 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आता 83 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. कोकणात सर्वाधिक 92 टक्के जलसाठा, पुण्यात 88 टक्के, नागपूर 80 टक्के, नाशिक 73 टक्के, अमरावती 71 टक्के आणि मराठवाडा विभागात 40 टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने जलसाठा 53.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोयनेच्या जलसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. धरणसाठा 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील सातही धरणांमध्ये मिळून 94.87 टक्के पाणीसाठा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP MajhaSatish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलंABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale House : धक्कादायक! अज्ञातांनी पेटवून दिला सतीश भोसलेच्या घराबाहेरचा परिसर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Bank Holiday : बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही 'या' राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget