Pandharpur Family death: विठुरायाच्या पंढरीत आक्रित घडलं, लहान मुलगा शेततळ्यात पडला, वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचाही बुडून मृत्यू
Pandharpur Family death: ही घटना दुपारी सव्वातीनच्या दरम्यान घडली. मात्र या परिसरात इतर कोणी नसल्यामुळे याबाबत कोणालाच घटनेची माहिती समजली नाही.

पंढरपूर : कोर्टी (ता. पंढरपूर) येथे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या पती, पत्नी व त्यांच्या पाच वर्षे मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू (Pandharpur Family death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा मृत्यू (Pandharpur Family death) झाला आहे. सुदैवाने त्यांचा मोठा मुलगा शाळेत गेल्यामुळे तो बचावला आहे. (Pandharpur Family death)
Pandharpur Family death: नेमकं काय घडलं?
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे सुरेश लाड व निखिल लाड यांचे शेत असून, या शेतामध्ये विविध कामे करण्यासाठी लोंढे पती-पत्नी राहत होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा शाळेत गेल्यामुळे घटनेच्या वेळी तो तेथे उपस्थित नव्हता. दरम्यान, सोमवारी शेतातील काम करत असताना त्यांचा लहान मुलगा प्रज्वल हा खेळत खेळत शेततळ्यामधील पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आईनेदेखील पाण्यात उडी (Pandharpur Family death) मारली. मात्र त्यांना शेततळ्यातून बाहेर येता येत नसल्यामुळे विजय लोंढे यांनी दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. शेततळ्यात असलेले शेवाळे व विजय लोंढे यांना मायलेकरांनी मिठी मारल्यामुळे या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी सव्वातीनच्या दरम्यान घडली. मात्र या परिसरात इतर कोणी नसल्यामुळे याबाबत कोणालाच घटनेची माहिती समजली नाही.(Pandharpur Family death)
Pandharpur Family death: मुलगा खेळताना पण्यात पडला, आईने उडी घेतली अन्...
पाच वर्षाचा मुलगा खेळत खेळत शेततळ्याकडे गेला आणि पाण्यात पडला. त्याला वाचवायला आईने शेततळ्यात उडी घेतली आणि ती देखील बुडू लागली. हे पाहताच चिमूरड्याच्या वडिलांनी दोघांना वाचवायला शेततळ्यात उडी घेतली, मात्र बाहेर पडता येत नसल्यामुळे तिघांचाही या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत नंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांचे मृतदेह (Pandharpur Family death) शेततळ्यातून बाहेर काढले. यामुळे पती-पत्नी आणि त्यांचा चिमुरडा या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असून जगण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील एका शेतात सालगडी म्हणून राहत होते.























