एक्स्प्लोर

Pandharpur Wari 2025 : माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उद्धटपणा, वारकरी महिलेला जोरात ढकलून दिलं; VIDEO व्हायरल, नेटीझन्स संतप्त

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होऊ लागला असून यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे.

सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा (Pandharichi wari) उत्साह पाहायला मिळत असून लाखो पाऊले पंढरीची वाट चालत आहेत. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगती ही पाऊले पंढरीच्या दिशेने विठ्ठल भक्तीच्या ओढीने पुढे जात आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar), संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्याही मोठ्या भक्तीभावाने मार्गक्रमण करत आहेत. कुठे दिंडी सोहळा, कुठे रिंगण सोहळा, कुठे अवजड घाट सर करत माऊली माऊलची गजर पाहायला मिळत आहे. मात्र, एका रिंगण सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असून वारीची शिस्त आणि वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट लावणारा हा व्हिडिओ आहे. डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या एका महिला वाकऱ्यासोबत एका चोपदाराने उद्धट वर्तन केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. 
 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होऊ लागला असून यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज 3 जुलै सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचे ऊभे रिंगण पार पडले. हे रिंगण झाल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. दरम्यान, अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि तुळस डोक्यावर घेतलेल्या एका महिला वारकऱ्यास जोरात ढकलून दिले. त्यामुळे, ती महिला वारकरी गोल रिंगण करुन समोर बसलेल्या वारकरी माऊींच्या आंगावर पडली. विशेष म्हणजे या महिला वारकरी भक्ताच्या डोक्यावरील तुळस पितळाची होती, दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. एवढं होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत, जोरजोराने ओरडत या महिलेशी ते वाद घालत होते. 

दरम्यान, संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणजेच आई म्हणतात, आणि याच माऊलीच्या पालखीत एका महिला वारकऱ्यास अशा पद्धतीची वागणूक येणे दुःखद आहे. त्यामुळेच, नेटीझन्सकडून या चोपदाराच्या उद्धटपणावर जोरदार प्रहार केला जात आहे. वारी म्हणजे शिस्त, शांती आणि प्रेमाची शिकवण देणारा वैष्णवांचा उत्सव. मात्र, माऊलींच्या पालखीतील हे चोपदार महाशय ही शिकवण विसरले काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

हेही वाचा

कोल्हापुरात धक्कादायक घटना; मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, शिक्षणक्षेत्रात खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget