एक्स्प्लोर

Narsayya Adam : प्रणिती शिंदेंच्या विधानसभेच्या जागी आडम मास्तरांची तयारी सुरू, आमदारकीचा वेध घेण्यासाठी सज्ज

Narsayya Adam : सोलापूर मध्य विधानसभेसाठी माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर सज्ज झाले असून त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्या ठिकाणी निवडून आलेल्या प्रणिती शिंदे या आता लोकसभेवर गेल्या आहेत.

सोलापूर: काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागी आता माकपचे जेष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी (Narsayya Adam) तयारी सुरू केली आहे. गुरुवारपासून माकपकडून 'नोट भी दो, वोट भी दो ' अभियान राबवण्यात येत असून माजी आमदार नरसय्या आडम यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरसय्या आडम यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यामागे ताकद लावली होती. 

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरसय्या आडम निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे या मागील तीन टर्म आमदार होत्या. प्रणिती शिंदे लोकसभेत निवडून गेल्याने आता सोलापूर मध्य विधानसभा महाविकास आघाडीने माकपला सोडावं अशी मागणी करण्यात येत आहे. 

आमचा पक्ष हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा आहे, निवडणुकीत पैसा लागतो. मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही 'वोट भी दो आणि नोट भी दो' असे आवाहन करतोय. जनतेकडून लोकवर्गणी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली. 

लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंचे पारंपरिक विरोधक असलेल्या नरसय्या आडम यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या बदल्यात आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा 74,196 मतांनी पराभव केला. 

लोकसभेच्या विजयात प्रणिती शिंदे यांना सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात 796 मतांची आघाडी मिळाली होती. या ठिकाणी आता नरसय्या आडम मास्तर इच्छुक असून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. 

आडम मास्तर शिंदेंचे कट्टर विरोधक

कॉम्रेड नरसय्या आडम हे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 1978, 1995 आणि 2004 च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता. 

कामगारांचा नेता अशी ओळख असलेला नरसय्या आडम मास्तर यांचा 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. जाई जुई विचारमंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रदार्पण करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. 

त्यानंतर झालेल्या 2014 आणि 19 च्या निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांचा पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. राष्ट्रीय पातळीवर जरी माकपणे अनेक वेळा काँग्रेस पुरस्कृत आघाडीला पाठिंबा दिला असला तरी सोलापुरात मात्र नेहमी चित्र वेगळे असायचे.

या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र हे चित्र बदललं असून नरसय्या आडम आणि सुशिलकुमार शिंदे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोलापूर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आता आडम मास्तरांना मदत करणार की वेगळी भूमिका घेणार हे पाहावं लागेल. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 07 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30 AM :07 जुलै 2024: ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 7July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget