भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, पावसातच स्वीकारलं निवेदन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळं इथ आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी भर पावसातच अजित पवारांची गाडी अडवली.
Ajit Pawar : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळं इथ आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी भर पावसातच अजित पवारांची गाडी अडवली. तसेच यावेळी त्यांना निवेदनही दिलं.
अजित पवार यांनी भर पावसात थांबून मराठा समाजाच्या मागण्या ऐकूण घेतल्या
मोहोळ येथील नरखेड फाट्याजवळ अजित पवारांनी पावसात गाडी थांबवून मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले आहे. यावेळी अजित पवार यांनी भर पावसात थांबून मराठा समाजाच्या मागण्या ऐकूण घेतल्या. पुणे सोलापूर महामार्गावर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोहोळ तालुक्यातील मराठा बांधवांनी अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजेनेच्या कार्यक्रमच्या निमित्ताने अजित पवार हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान, मोहोळ येथे काही तासापूर्वी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील आंदोलकांनी केला होता.
अजित पवार हे मोहोळ येथून कार्यक्रम उरकून अनगरकडे परतत होते
अजित पवार हे मोहोळ येथून कार्यक्रम उरकून अनगरकडे परत जात होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता. अशातच हॉटेल स्वराज समोरुन अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा आंदोलक घोषणाबाजी करत होते. हे पाहून अजितदादांनी गाडी थांबवून आंदोलकांशी चर्चा केली. तसेच त्यांचे निवेदनही घेतले. मुसळधार पाऊस चालू असूनही ताफा पुढे जात असताना दादांनी गाडी थांबवायला लावली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यात जनसंवाद यात्रा सुरु आहे. ही यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये आली होती. यावेळी त्यांची जाहीर सभा देखील झाली. मोहळचे विद्यमान आमदार यशवंतच माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवार यांची जाहीर सभा झाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षाचे नेते दौरे, संवाद यात्रा काढत आहे. त्याच अनुषंगाने अजित पवार यांची देखील यात्रा सुरु आहे. दरम्यान, यात्रेचा अजित पवार यांना किती फायदा होणार हे निवडमुका झाल्यानंतरचत समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा