मोठी बातमी : ... तर भाजपविरोधात पाचही जागा लढणार, शिंदेंच्या शिवसेनेची आक्रमक भूमिका
सोलापूर मध्यची ( Solapur Central Vidhansabha) जागा शिवसेना शिंदे गटाला ( Shiv Sena Shinde Group) जरं सोडली नाही तर सोलापुरातील पाचही जागांवर भाजपच्या विरोधात लढणार असल्याची शिवसेना शिंदे गटानं घेतलीय.
Vidhansabha Election Solapur : सोलापूर मध्यची ( Solapur Central Vidhansabha) जागा शिवसेना शिंदे गटाला ( Shiv Sena Shinde Group) जरं सोडली नाही तर सोलापुरातील पाचही जागांवर भाजपच्या विरोधात लढणार असल्याची आक्रमक भूमिका सोलापूर शिवसेना शिंदे गटानं घेतली आहे. आम्ही जिंकलो नाही तरी चालेल पण भाजपच्या पाच जागा आम्ही पाडल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी दिला आहे.
या पाच मतदारसंघात भाजपविरोधात उमेदवार देणार
सोलापुरात शिवसेना शिंद गट आक्रमक झाला आहे. सोलापूर मध्यची जागा भाजप लढणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहेय याच मुद्यावरुन सोलापूर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. या निर्णयचा महाराष्ट्रमधील युतीचा काहीही संबंध नाही, सोलापुरातील शिवसेना संपू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली आहे. सोलापूर मध्य, सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा या मतदार संघात भाजप विरोधात उमेदवार देणार असल्याचे अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: