एक्स्प्लोर

Solapur News : सोलापूरचा सुबोध भैसारे JMFC परीक्षेत राज्यात पहिला, मागच्या वर्षी मोठा भाऊ कलेक्टर तर यंदा स्वत: झाला न्यायाधीश

Solapur : सोलापूरचा सुबोध भैसारे जेएमएफसी परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. 200 पैकी तब्बल 178 गुण मिळवलेल्या सुबोधच्या यशाचं सर्वत्र कौतुक झाले आहे.

Solapur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)  घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत सोलापूरचा सुबोध भैसारे हा राज्यात पहिला आला आहे. सुबोध याने 200 पैकी तब्बल 178 गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकवालं आहे. सुबोधचे वडील अशोक भैसारे देखील न्यायाधीश राहिले आहेत. त्यामुळे त्यांची दुसरी पिढी न्यायिक क्षेत्रात येणार आहे. वयाच्या 27 व्या वर्षी सुबोधने यशाला गवसणी घातली आहे. मागील वर्षी देखील सुबोधने JMFC परीक्षा दिली होती. मात्र त्यात यश आले नाही. मात्र या अपयशने खचून न जाता सुबोधने परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. यंदा मात्र राज्यात पहिला क्रमांक मिळवला. सुबोधच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

अपयशानंतर यशाला गवसणी

सुबोधचे माध्यमिक शिक्षण हे सोलापुरात झाले आहे. पुण्यातल्या आयएसएस महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या 27 व्या वर्षी सुबोधने यशाला गवसणी घातली आहे. मागील वर्षी देखील सुबोधने JMFC परीक्षा दिली होती. मात्र मुख्य परीक्षेत त्याला यश आलं नाही. मात्र या अपयशाने खचून न जाता सुबोधने परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. यंदा मात्र राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय आहे. "मी शालेय जीवनापासून नेहमीच प्रत्येक परीक्षेत टॉपर राहिलो आहे. त्यामुळे मला अपयश कधी आलेले नव्हते. मात्र JMFC च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आल्याने मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी अधिकच नम्र झालो. अपयश आल्यानंतर मी माझ्या पेपर कॉपी मागवल्या. त्यात नेमक्या कुठे चुका झाल्यात हे तपासले. त्या चुकांवर काम केल्याने यंदा यश प्राप्त झाले," अशी प्रतिक्रिया सुबोध भैसारेने दिली. 

मुलगा न्यायाधीश झाल्यानंतर वडिलांना आनंदाश्रू अनावर 

सुबोध याचे वडील अशोक भैसारे हे मूळचे गोंदिया जिल्ह्याचे आहेत. ते स्वत: देखील न्यायाधीश राहिले आहेत. धुळे, चंद्रपूर, नागपूर, पुणे, ठाणे आणि सोलापूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवा बजावली आहे. ते सध्या सोलापूरच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आहेत. अतिशय संघर्षातून ते स्वतः न्यायाधीश झाले. आता त्यांची दुसरी पिढी न्यायिक क्षेत्रात येणार आहे. विशेष म्हणजे सुबोध भैसारे याचा मोठा भाऊ शुभम भैसारे हे देखील मागील वर्षी IAS परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आता सुबोध न्यायाधीश झाला आहे. त्यामुळे भैसारे कुटुंबियांच्या आंनदाला पारावार उरला नाही. हा आनंद व्यक्त करताना सुबोध भैसारे यांच्या वडिलांना आनंदश्रु अनावर झाले. "दोन्ही मुलांच्या यशाने मला प्रचंड आनंद झाला आहे. हे यश म्हणजे त्यांचेच कर्तृत्व आहे. आई-वडील म्हणून जे आमचे काम आहे आम्ही ते केलं. त्यांनी स्वतःच करिअर निवडलं आहे. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं. त्यामुळे त्यांना यश मिळाले," अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती अशोक भैसारे यांनी दिली. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget