Siddheshwar Maharaj Yatra : सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचा आज दुसरा दिवस, 12 वाजता अक्षता सोहळा पार पडणार
Siddheshwar Maharaj Yatra : शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. या यात्रेतील आज (14 जानेवारी) दुसरा महत्वाचा दिवस आहे.
Siddheshwar Maharaj Yatra Solapur : सोलापूरचे (Solapur) ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा (Siddheshwar Maharaj Yatra) मोठ्या उत्साहात सुरु आहे. या यात्रेतील आज (14 जानेवारी) दुसरा महत्वाचा दिवस आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी यात्रेतील विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी यन्नीमज्जन म्हणजेच हळदीचा सोहळा पार पडला. तर आज दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडणार आहे.
मानाच्या 7 नंदीध्वजाची मिरवणूक आज निघणार
दरम्यान, आज सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाड्यातून मानाचे 7 नंदीध्वजाची मिरवणूक निघणार आहे. शहरातील दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्यावर पोहोचेल. या ठिकाणी सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पुजा केली जाईल. त्यानंतर मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला जातो. त्यानंतर संमती कट्यावर सर्व मानकरी आल्यानंतर श्री तम्मा शेटे संमती (अक्षता) वाचन करतात. हा अभूतपूर्व असा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी उपस्थित असतात.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविकांची उपस्थिती
काल नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा पार पडला. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) इत्यादी राज्यातून देखील भाविक येत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही. कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना कालपासून सुरुवात झाली.
उद्या मकर संक्रांत
प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडत असतो. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे 13 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत असतो. यंदाच्या वर्षी अधिक महिना आल्यानं मकर संक्रांत ही एक दिवस उशिरा म्हणजे 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. त्यामुळं सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा 13 जानेवारी ऐवजी 14 जानेवारी म्हणजे आज साजरा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: