सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी द्यावी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची थेट प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
Solapur Lok Sabha Constituency : विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडेच थेट ही मागणी करण्यात आली आहे.
सोलपुर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर इच्छुकांची गर्दी देखील वाढतांना पाहायला मिळत असून, सर्वच पक्षातील नेते कामाला लागले आहेत. तर, आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील कमाल लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून (Solapur Lok Sabha) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलीय. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडेच थेट ही मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात मंगळवारी सोलपुर शहर आणि ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर, काँग्रेसकडून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यात आमदार शिंदे यांचे नाव असेल, असे आश्वासन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाची बैठक...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात बैठकांचा धडका पाहायला मिळत आहे. जागावाटपापासून ते लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या आढावापर्यंत या बैठका होत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांची देखील या बैठकांमध्ये उपस्थिती पाहायला मिळत आहे. अशात सोलापूर लोकसभा मतदारसंघाची देखील मंगळवारी काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात बैठक झाली. सोलापूरचा उमेदवार अध्याप ठरला नसून, यावर लवकरच निर्णय होणार आहे. मात्र, उमेदवार कोणीही असला तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा फडकवण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला.
प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय
दरम्यान काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल असून, हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय मुंबई येथील या बैठकीत घेतल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :