Solapur News : गणपतराव देशमुखांचे दोन्ही नातू 'एकसाथ' फडणवीसांच्या भेटीला, वाचा नेमकी का घेतली भेट?
Solapur News : शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते आणि सांगोला मतदारंघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या दोन्ही नातवांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला (Sangola) हा शेतकरी कामगार पक्षाचा (Shetkari Kamgar Paksh) बालेकिल्ला मानला जातो. 55 वर्षाहून अधिक काळ दिवंगत गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हा किल्ला ढासळला. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर 2019 ला त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर अनिकेत देशमुख हे मत मतदारसंघापासून दूर राहिले होते. त्यानंतर गणपतराव देशमुखांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख राजकारणात सक्रीय झाले. त्यामुळं गणपतराव देशमुख यांच्या घरात विसंवाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सगळ्यावर गणपतरावांच्या नातवांकडून "हम साथ साथ है"चा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. या दोघांनी एकसाथ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगोला मतदारसंघाचा उमेदवार कोण?
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जातो. मात्र गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांना थोड्या मताने पराभव स्वीकारावा लागला होता. पण विधानसभा निवडणका झाल्यानंतर अनिकेत देशमुख हे सांगोला मतदारसंघापासून दूर राहिले होते. अनिकेत देशमुख मतदारसंघापासून दूर असताना गणपतराव देशमुख यांचेच दुसरे नातू असलेल्या बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. त सातत्यानं मतदारसंघातील जनतेच्या अडी अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मतदारसंघात दौरे देखील करत आहेत. त्यामुळं बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात संपर्क वाढवल्यानंतर पुढच्या वेळेस म्हणजे मतदारसंघातून शेकापची उमेदवारी कोणाला? असा प्रश्न मतदारांना पडला होता. यातूनच गणपतराव देशमुख यांच्या घरात विसंवाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
30 जुलैला गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी, पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी फडणवीसांना निमंत्रण
काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांना देशमुख परिवारातून उमेदवार कोण असणार, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी केडर जो निर्णय घेईल, तो निर्णय मान्य असेल, असं उत्तर दिलं होत. पण या सगळ्यावर गणपतरावांच्या नातवांकडून "हम साथ साथ है"चा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 30 जुलै रोजी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या आयोजनासाठी नुकतीच सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने देशमुख यांच्या नातवांनी आपण एकत्र असल्याचा संदेश तालुक्यातील जनतेला दिला आहे. याशिवाय याच दिवशी सांगोला कॉलेज परिसरात गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांनी एकत्रितपणे जाऊन आम्ही एकच आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवंगत गणपतराव देशमख यांचे दोन्ही नातू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंग लागल्या होत्या. मात्र, हे दोन्ही बंधू फडणवीसांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. एकत्र फडणवीसांना भेटण्यासाठी जाऊन देशमुख बंधूंनी हम एक साथ साथ चा संदेश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
गणपतराव देशमुख यांच्या आठवणीने शरद पवार गहिवरले, सांगोल्यात कुटुंबियांची घेतली भेट