एक्स्प्लोर

Solapur News : सोलापुरातील कांदा अडत व्यापाऱ्याची साडे चार कोटी रुपयांची फसवणूक, केरळमधील दोघांवर गुन्हा दाखल

सोलापुरातील (Solapur) कांदा अडत व्यापाऱ्याची तब्बल साडे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

Solapur News : सोलापुरातील (Solapur) कांदा अडत व्यापाऱ्याची तब्बल साडे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केरळमधील (Kerala) दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा खरेदी करुन साडे चार कोटी रुपये अदा न केल्यानं केरळमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन असे केरळ येथील रहिवासी असलेल्या आरोपीचे नाव आहे.

ल भारत ओनियन या दुकानातून कांदा खरेदी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन या दोघा भावांडानी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भारत ओनियन या दुकानातून कांदा खरेदी केला होता. या दोघांनी आतापर्यंत चार कोटी 55 लाख 95 हजार रुपये 71 रुपयांचा कांदा खरेदी केला आहे. अद्याप या दोघांनी कांद्याचे पैसे अदा केले नाहीत. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भारत ऑनियनचे मालक साजिद अजमेरी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात दिली फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. 

विश्वास संपादन करुन फसवणूक

साजिद अजमेरी यांचे भारत ओनियन नावाने सोलापूर मार्केट यार्डात कांद्याचा आडत व्यवसाय आहे. केरळातील नजीब हमजा अंचलन आणि फतेह हमजा अंचलन यांनी साजिद अजमेरी यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कांदा घेतला. सुरुवातीला घेतलेल्या कांद्याची रक्कम आरोपींनी वेळोवेळी दिली होती. यानंतर साजिद अजमेरी यांनी विश्वासाने केरळातील या दोघा व्यापाऱ्यांना 23 नोव्हेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान 4 कोटी 55 लाख 95 हजारांचा कांदा विक्री केला होता. या विश्वासाचा फायदा घेत केरळातील व्यापाऱ्यांनी सोलापुरातील कांदा व्यापाऱ्याची जबर फसवणूक केली आहे. कोट्यावधी रुपयांची रक्कमेची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर 25 ऑगस्ट 2023 रोजी सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. 

सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी उलाढाल

सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि रब्बीतील कांदा या हंगामात मार्केटमध्ये येतो. याच दरम्यान कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही कांद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे सोलापूरचे कांदा मार्केट या कालावधीत चांगलेच चर्चेत येते. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या राज्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र सोलापूर बाजार समितीतील कांद्याची आवक वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Solapur News: सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांचा वाहन चालक असल्याचे सांगत सोनाराला गंडा, सराफाची साडेचार लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget