एक्स्प्लोर

Solapur : सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान, दोन वर्ष ऊसाचं गाळप राहणार बंद : धर्मराज काडादी  

सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडली आहे. चिमणी पाडल्यामुळे पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नसल्याचे मत कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं.

Siddheshwar Sugar Factory : सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडली आहे. कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही. या पाडकाममुळं साधारण एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मत कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

मूठभर लोकांच्या विमानसेवेसाठी एखादा उद्योग बंद पाडणे खेदजनक

सोलापूरला नागरी विमानसेवा सुरु करताना अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी 15 जून रोजी प्रशासनाने पाडली आहे. त्यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापुरात अतिशय घाणेरडे राजकारण झालं असून, त्याचा बळी चिमणी ठरली. मूठभर लोकांच्या विमानसेवेसाठी एखादा उद्योग बंद पाडत असतील तर खेद वाटत असल्याचे काडादी म्हणाले. पुढचे एक नाही तर किमान पुढचे दोन सीजन तरी कारखाना सुरु होईल की नाही अशी स्थिती असल्याचे धर्मराज काडादी म्हणाले.

सोलापूरच्या या चिमणीचा वाद नेमका काय आहे? या मागे राजकारण काय आहे? ते पाहुयात. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली आहे. या चिमणीमुळे सोलापूरचं वातावरण अनेकवेळा तापलेलं पाहायला मिळालं. 2014 साली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात केली. मात्र, ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा असल्याने ती पडण्याची मागणी अनेकांनी केली होती.

साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रवास

2014 साली कारखान्याच्या विस्तारीकरणातून सह वीज निर्मितीसाठी 92 मीटर उंचीची चिमणी उभरण्यास सुरुवात 

2017 साली महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेताचं कारखान्याने चिमणीचे बांधकाम पूर्ण करत वापर सुरु केला. 

सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक संजय थोबडे यांनी चिमणी अधिकृत असल्याची तक्रार दाखल केली

महापालिकेच्या नोटीसीनंतर सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली, मात्र हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

2018 साली अनधिकृत चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाकडून पथक कारखान्यात गेले मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे कारवाई थांबली

सिद्धेश्वर कारखाना प्रशासन सर्वोच्च न्यायालयात गेले, साखरेच्या गाळप हंगामामुळे चिमणीवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती

सोलापुरात विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनाची स्थापना

2023 साली सर्वोच न्यायालकडून न्यायालयातील प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणि त्यानंतर प्रकरण पुन्हा डीजीसीएकडे वर्ग

डीजीसीएचा मुद्दा बाजूला ठेवत सोलापूर महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र सुनावणी घेत चिमणी पाडण्याचे आदेश दिले

27 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या 45 दिवसाच्या नोटीसीनंतर अखेर 15 जून पासून कारखान्याची अनधिकृत चिमणीचे पाडकाम सुरू झाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दीMumbai Rain:पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका; Amol Mitkari , Anil Patil थेट रेल्वे ट्रॅकवरुन निघालेMumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहूनKurla Water will Accumulate :  कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Embed widget