एक्स्प्लोर

फडणवीसांच्या हस्ते महापूजा! चारवेळा आषाढीला अन् दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी; तर विरोधामुळे एकदा निवासस्थानीच केली पूजा

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा महापूजा झाली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. तर, दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

बऱ्याच विरोधानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे. आज पहाटे फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर, एकदा विरोध झाल्याने फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानीच मध्यरात्री महापूजा केली होती. शिवाय आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा महापूजा झाली आहे. 

अजितदादा महापूजेसाठी तीनवेळा विठ्ठल चरणी

यंदाच्या कार्तिकी एकादशीला महापुजेसाठी आमंत्रण देतांना मंदिर समिती चांगलीच अडचणीत आली होती. कारण सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्या उपमुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समोर आले. मात्र, यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना देखील कार्तिकीच्या महापुजेची संधी मिळालेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोरोना परिस्थितीतही दोनवेळा अजितदादा महापूजेला आले होते. तत्पूर्वी एकदा त्यांना संधी मिळाली होती. त्यामुळे आतापर्यंत तीनवेळा अजित पवार यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा 

वारीची ही प्रथा फार जुनी असून, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा (वार्‍या) पाहायला मिळतात. ज्यात, चैत्री यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्राचा समावेश आहे. दरम्यान, कार्तिकी यात्रा म्हणजेच कार्तिकी एकादशी ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. असे म्हणतात की, शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन पाहायला मिळतात. या काळात संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते, आणि एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. त्यानंतर पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kartiki Ekadashi : फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Laxman Hake : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
ओबीसींच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget