...तरच शरद पवार यांच्या कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल; गोपीचंद पडळकरांचा निशाणा
Gopichand Padalkar : शरद पवार यांच्या कुटुंबाच्या रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. रेशनकार्डवर जेवढी नावे आहेत त्यांची डिटेलमध्ये चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांच्या रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींची एकदा चौकशी करा, तरच त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी टीका भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. गोपिचंद पडळकर यांनी एबपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली.
"संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डवरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. रेशनकार्डवर जेवढी नावे आहेत त्यांची डिटेलमध्ये चौकशी करावी. संपूर्ण चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल. शरद पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा एजन्सींनी देखील सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.
गोपिचंद पडळकर यांनी यावेळी शिवसेनेवर (Shiv Sena) देखील जोरदार टीका केली. "ज्यांना लोकांमध्ये काहीही किंमत नाही, जनाधार नाही, अशा लोकांसोबत ते युती करत असून यावरून शिवसेना किती खोलात गेली आहे हे समोर आले आहे. पण अशा कोणत्याही टेकूने आता शिवसेना वर येणार नसल्याचे सांगत संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्याने पडळकर यांनी शिवसेनेवर टीका केली.
पडळकर म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली आहे. आता त्यांना परत ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे. ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला, ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी ( ED Investigation ) करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोपिचंद पडळकर यांनी संपूर्ण पवार कुटुंबाची चौकशी करण्यात यावी असे म्हटले आहे. रेशनकार्डवर जेवढी नावे आहेत त्यांची डिटेलमध्ये चौकशी करावी. संपूर्ण चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या