एक्स्प्लोर

Ram Satpute: माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न, कटाचे मास्टरमाईंड धैर्यशील मोहिते पाटील; राम सातपुतेंचा आरोप

Ram Satpute: माळशिरस तालुक्यात 3 दिवसापासून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सोलापूर: माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असतील, असा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी केला आहे. माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत. काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा करण्याचा प्रकार होता. याबाबत आपल्या हत्येत कोण कोण असू शकते. या संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चिठ्ठी दिली असल्याचेही राम सातपुते यांनी सांगितले आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या हत्येचा कट रचला गेला. असा दावा ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. यानंतर राम सातपुते यांनी त्यांच्या हप्त्याच्या कटाबाबत आपली भूमिका मांडली आहे.(Ram Satpute)

माझ्या हत्येचा कट रचण्यात आला

राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे काही सांगितलं, माझ्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्याचे त्यांना काही इनपूट मिळाले आहेत, मला हे सर्व कालच माहिती झालं, मुळात निवडणुकीच्या दरम्यानच नाही तर एंकदरीत इंटेलिजनचे गुप्त खात्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे एसपी बाकी सगळ्यांना काही माहिती भेटली होती. त्यावरती चौकशी सुरू आहे. कुठल्यातरी बाहेरच्या टोळीला सांगून कॉन्ट्रॅक्ट किलिंग करायचा काहीतरी कट असल्याचं एकंदरीत पोलिस प्रशासन,इंटेलिजनने पुढे आलेले आहे, या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या नेते मंडळीच्या कानावरती हा विषय दिलेला आहे. जयकुमार गोरे यांनी हा विषय सर्वत्र सांगितला आहे. हा विषय त्यांच्या कानावर आला,  तेव्हापासून सर्व प्रशासन, पोलिस प्रशासन माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहे, काही लोकांना उचललं आहे, काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत, त्यांचे बँक डिटेल तपासले जात असल्याचंही राम सातपुते यांनी सांगितलं आहे.(Ram Satpute)

मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींना सिरीअसली घेतलं आहे

तर ते पुढे बोलताना म्हणाले की, जे काही तपास आहेत ते सुरू आहेत, प्रामु्ख्याने धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून असे प्रकार करत असल्याचं आमच्या कानावर आलं आहे, मुळात संवैधानिक पध्दतीने आम्ही ही निवडणूक लढवली आहे, राम सातपुते कायदा माननारा माणूस आहे, संविधानाने चालणारा मी आहे, अशा पध्दतीने ठोकशाहीची भाषा करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींना सिरीअसली घेतलं आहे, मला हा प्रकार दोन दिवसांनी माहिती झाला, जिल्ह्याचे एसपी आणि पालकमंत्री आय़जी यांच्या लेवलवरती हा विषय सुरू होता, मला काल हा विषय माहिती झाला, मुळात असे प्रकार करणं ही यांची संस्कृती आहे, त्यामुळे भविष्यामध्ये माझ्या जिवाला काही झालं तर याची चिठ्ठी मी काल पालकमंत्री गोरे यांच्याकडे दिली आहे, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, अशा पध्दतीने दे राजकारण करत असतील तर ते दुर्दैवी आणि घातक आहे, असंही राम सातपुते यांनी म्हटलं आहे.(Ram Satpute)

धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यामागचे मास्टरमाईंड

मी गोरे यांना यामध्य कोण कोण असू शकतं, याचं उत्तर दिलं आहे, आता यांची संवैधिनिक मार्गाने लढण्याची हिम्मत संपली आहे, आता ते अशा मार्गाने जात आहेत, म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे की, अर्जुनसिंह मोहिते पाटील, काल म्हणाले राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं,धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यामागचे मास्टरमाईंड आहेत, ते हे सगळं करत आहेत, याबाबत माझं फडणवीसांशी बोलणं झालेलं आहे, आणि याच्यात कोण असू शकतं ते सांगितलं आहे, ते या असतील नसतील माहिती नाही, तो पोलिसांचा तपासायचा विषय आहे, याचा पोलिस तपास करत आहेत, हे अतिशय चुकीचं आहे, अशंही पुढे राम सातपुते यांनी म्हटलं आहे.(Ram Satpute)

 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget