वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीने नवा वाद उभा राहण्याची शक्यता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे निधीमधून दिंड्यांना 50 हजाराचे अनुदान देण्याची परिषदेची मागणी
शासनाने मागणी मान्य न केल्यास वारकरी साहित्य परिषद आंदोलन करेल आणि वेळ पडल्यास वारी थांबवू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.
Ashadhi Wari: अंधश्रद्धा आणि जादूटोणा निर्मूलंनासाठी असणारे बजेट कोठेही खर्च होऊन वाया जाते असा आरोप करत गळ्यात माळ घातलेला वारकरी व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत वारी करत असतो. चुकीच्या ठिकाणी खर्च होणाऱ्या निधीतून दिंड्यांना 50 हजाराचे अनुदान दिल्यास परिस्थितीमुळे वारी करता न येणाऱ्या हजारो इतर गोरगरीब कष्टकऱ्यांना या पैशातून वारी घडेल असा अजब दावा विठ्ठल पाटील यांनी केला आहे. हे अनुदान देताना मंदिर समिती अथवा तहसीलदार यांच्याकडून माहिती घेऊन अनुदान वितरित करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
वेळ पडल्यास वारी थांबवण्याचा इशारा
आषाढी यात्रा काळात विविध पालखी सोहळ्यातून जवळपास 4500 पेक्षा जास्त दिंड्या पायी चालत येत असतात.आता पाटील यांच्या मागणीनुसार साधारण साडे बावीस कोटी रुपये शासनाला द्यावे लागणार आहेत . शासन हे पैसे देईल देखील मात्र वारकरी संप्रदायाला आपल्या पवित्र वारीसाठी अशी शासनाकडून आर्थिक मदत चालणार आहे का हाच वादाचा मुद्दा ठरणार आहे . ही मागणी शासनाने मान्य न केल्यास वारकरी साहित्य परिषद आंदोलन करेल आणि वेळ पडल्यास वारी थांबवू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.
नवा वाद उभा राहण्याची शक्यता
विठुरायाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने वारकरी पायी चालत येत असतात.वारकरी संप्रदाय हा आपल्या परंपरा पाळत चालत येत असताना शासन अथवा कोणाच्या मदतीवर कधीच अवलंबून नसतो मात्र आता विठ्ठल पाटील यांच्या मागणीने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे .
राज्य सरकारर्फे आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर मोफत औषधोपचार देखील दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही अभिनव योजना आणली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. त्यासाठी एका महिन्यात आरोग्य विभागाची राज्यातील सर्व रिक्त पदं भरण्यात येतील, असा दावा देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. गेल्या वर्षी आषाढी यात्रेच्या तोंडावर राज्यात शिंदे सरकार आल्याने भाविकांसाठी खास काही करता आले नव्हते, त्यामुळे यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या मोहिमेअंतर्गत जवळपास 20 लाख वारकऱ्यांचे शहरातील 3 ठिकाणी मेगा आरोग्य कॅम्प घेतले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा: