एक्स्प्लोर

कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरीत 24 तास विठ्ठल दर्शन सुरू; महानैवेद्य योजनेत सहभागी होता येणार

आषाढी व कार्तिकी यात्रा कालावधीत देवाची निद्रा बंद होत असल्याने परंपरेप्रमाणे देवाचा पलंग उद्या काढला जाणार आहे.

सोलापूर : आषाढी-कार्तिकी भक्तगण येती... म्हणत पंढरीच्या (Pandharpur) पांडरायाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे, आषाढीच्या वारीनंतर भाविकांना उत्सुकता असते ती कार्तिकी एकादशीची. कार्तिकी सोहळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना अखंड देवाच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी उद्या देवाचा पलंग निघणार असून उद्यापासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. आषाढी व कार्तिकी या दोन यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भावी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी उद्यापासून देव 24 तास दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. उद्यापासून कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे. 

यासाठी आषाढी व कार्तिकी यात्रा कालावधीत देवाची निद्रा बंद होत असल्याने परंपरेप्रमाणे देवाचा पलंग उद्या काढला जाणार आहे. याचाच अर्थ भक्तांसाठी विठुराया उद्यापासून  24 तास मंदिरात उभा असणार आहे . चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढण्याची परंपरा आहे.  यावर्षी कार्तिकी साठी उद्या दिनांक 04 नोव्हेंबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून सकाळी 7.30 वाजता श्रींचा पलंग काढण्यात येणार आहे. अखंड दर्शनासाठी उभा राहणाऱ्या विठुरायाला थकवा जाणू नये म्हणून देवाच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर नित्य पूजा, नैवेद्य ,पोशाख आणि लिंबू पाणी या विधी व्यतिरिक्त जवळपास देव सव्वा बावीस तास भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे . श्रींचा पलंग काढण्यात आल्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. कार्तिकी यात्रेनंतर देवाची प्रक्षाळ पूजा दिनांक 20 नोव्हेंबर होणार असून यानंतर देवाचे 24 तास दर्शन व्यवस्था बंद होईल.      

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस महानैवेद्य समर्पित करण्यासाठी रू.7,000/- देणगी देऊन महानैवेद्य सहभाग योजनेत सहभागी होता येते. त्याची दिनांक 01 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील नोंदणी देखील सुरू करण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.  त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 224466 व 223550 या क्रमांकावर व श्री संत तुकाराम भवन,  पंढरपूर येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

हेही वाचा

एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना फोडली; ठाकरेंच्या खासदाराने तोफ डागली

 

महत्त्वाच्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन
'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Embed widget