एक्स्प्लोर

Sindhudurg Crime: सिंधुदुर्गात बांधलेल्या विदेशी महिलेच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर जोमाने चक्रे फिरली; अमेरिका दूतावासची एन्ट्री

Sindhudurg Crime: सोनुर्ली–रोणापाल येथील जंगलात साखळदंडाने झाडाला लॉकने महिलेला बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Sindhudurg Crime सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हयातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात मूळ अमेरिकन महिलेला (Sindhudurg foreign woman) साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रकृती ढासळलेल्या या महिलेला उपचारासाठी गोव्यात बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेसोबत घडलेल्या या अमानवि घटनेची गंभीर दखल आता अमेरिकन दूतावासाने घेतली आहे.

सोनुर्ली–रोणापाल येथील जंगलात साखळदंडाने झाडाला लॉकने महिलेला बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिला ओरडत असताना एका गुराख्याच्या हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांच्या मदतीने ललिता कायी कुमार एस. या अमेरिकन महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस उपाशीपोटी पावसात असलेल्या महिलेची प्रकृती ढासळल्याने तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिकट झाल्याने तिला बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये रोख-

तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये रोख सापडले आहेत. पोलिस मोबाईच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन दुतावासाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जोमाने फिरविण्यास सुरुवात केली आहे.

एक टीम तामिळनाडू, दुसरी टीम गोव्यात-

घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक टीम तमिळनाडू येथे तर दुसरी टीम गोव्यात रवाना करण्यात आली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात त्यामुळे गोव्यात देखील याचा तपास केला जाईल. तर महिला गेल्या दहा वर्षापासून तमिळनाडूत वास्तव्यास असल्याने तिथेही तपासाच्या दृष्टीने पोलिस दाखल झाले आहेत.

पतीविरोधात बांदा पोलिसांत गुन्हा दाखल-

सावंतवाडीतील सोनुर्ली-रोणापाल च्या जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पती विरोधात बांदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे.सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तामिळनाडू येथील तिच्या मूळ पत्त्यावर तपासा साठी गेली असून तेथील तपासा नंतर अधिक माहिती समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्या वर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे उलगडणार आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी या प्रकरणात तपासा पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकन दूतावास यात लक्ष घातल्याने सत्यता पडताळून पोलीस प्रशासनाच्या वतीने माहिती दिली जाणार असल्याच सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं?

सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. सदर महिला अनेक दिवस उपाशी असल्याने, तिला अन्न-पाणी न मिळाल्याने अत्यंत अशक्त झाली होती. उपचार सुरू झाल्यानंतर त्या महिलेने एका कागदावर लिहून तिच्या पतीवर आरोप केले आहेत. तिच्या पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचं तिने सांगितलं. तसेच गेल्या 40 दिवसांपासून ती त्या जंगलात होती असा दावा या महिलेने केला आहे. 

संबंधित बातमी:

Sindhudurg Crime: सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेली विदेश महिला अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर शिक्षक; दहा वर्षांपूर्वी भारतात....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget