CJI धनंजय चंद्रचूड यांच्या कुटुंबियांचे सिंधुदुर्गशी आगळंवेगळं नातं, वडिलांचे शिक्षण सावंतवाडीत तर आजोबा होते संस्थानात दिवाण
Sindhudurg News : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड कुटुंबियांचे सिंधुदुर्गमधील सावंतवाडीशी एक आगळंवेगळं नातं आहे. त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले तर आजोबा सावंतवाडी संस्थानचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.
Sindhudurg News : भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड (Yashwant Chandrachud) यांच्यानंतर त्याचे सुपूत्र धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी भारताचे 50 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून काल (9 नोव्हेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्याकडून शपथ घेतली. चंद्रचूड कुटुंबियांचे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडीशी (Sawantwadi) एक आगळंवेगळं नातं आहे. त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले तर आजोबा सावंतवाडी संस्थानचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. वडील यशवंत चंद्रचूड हेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. आता त्यांच्या सुपुत्राने सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे चंद्रचूड यांची दुसरी पिढी ही सर्वोच्चपदी विराजमान झाली आहे.
चंद्रचूड हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करसेनर गावचे रहिवासी आहेत. मात्र चंद्रचूड घराण्याची नाळ पूर्वीपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थांनात दिवाण होते. त्या काळात माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे काही शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यानंतर हे घराणे मुंबईत गेले. पुढे विष्णू चंद्रचूड यांचे पुत्र यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले.
सावंतवाडी संस्थानाशी चंद्रचूड घराण्याने नाळ कायम
यशवंत चंद्रचूड सर्वाधिक काळ सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहिले.1978 ते 1985 या काळात ते सरन्यायाधीश होते. त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यावर निकाल लागले. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांनी यशवंत चंद्रचूड यांचा सत्कारही केला होता. त्यानंतर राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धनंजय चंद्रचूड यांनी हजेरी लावली होती. सावंतवाडी संस्थानाशी चंद्रचूड घराण्याने कायम नाळ ठेवली. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते. पूर्वी संस्थानात राजांच्या अनुपस्थितीत दिवाण हे न्याय निवाड्याचे करत असत. धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र यशवंत चंद्रचूड न्यायाधीश बनले. तीच परंपरा धनंजय चंद्रचूड यांनी पुढे चालू ठेवली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आहेत.
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी देशाची राजधानी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात BA ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून LLM आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.
संबंधित बातमी