Rajan Teli : दसऱ्यादिवशीच ठाकरेंना धक्का! निष्ठावंत राजन तेली शिंदे गटात, मेळ्याव्यातच केला प्रवेश
Rajan Teli Joins Shiv Sena Eknath Shinde : राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. ते आता शिंदे गटात गेले आहेत.

मुंबई : उद्धव ठाकरे यांना दसऱ्याच्या दिवशीच एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे एकनिष्ठ समजले जाणारे सिंधुदुर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. नेस्को येथे शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यातच त्यांनी प्रवेश केला.
राजन तेली हे विधानसभा निवडणूकपूर्वी भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेने आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा दीपक केसरकर यांच्या विरोधात पराभव झाला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता दसरा मेळाव्याच्या दिवशीच राजन तेली यांनी ठाकरेंची साथ सोडली.
Who Is Rajan Teli : कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म 25 जून 1970 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला. 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केले.
1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद.
1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती.
1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले.
1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी.
2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश.
2007 साली विधान परिषद आमदार.
2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचा चेअरमन.
2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं.
2020 साली भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद.
2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक राजन तेली यांनी भाजपकडून लढवली होती. त्यावेळी शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी त्यांचा पराभव केला.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला.
























