सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात बोटीवरील खलाशांमध्ये वाद, एका खलाशाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवलं
मासेमारी नौकेला आग लागल्याने नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी देवगड पोलीस पंचनामा करत असून तपास करत आहेत.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील देवगड (Devgad) बंदरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास बोटीवरील खलाशामध्ये वाद झाले. हे वाद विकोपाला गेल्याने या वादातून एका खलाशाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले.बोटीवरील केबिनेटमध्ये हे वाद झाले. त्यांनतर स्वतः ला पेटून घेतलेल्या खलाशाने केबिनेट तोडून त्याला वाचवण्यासाठी इतर खलाशी जात असताना त्याने थेट केबिनच्या मागे असणाऱ्या जाळीत उडी घेतली. मच्छिमार (Fisherman) जाळीवर त्या खलाशाने उडी मारल्याने जाळीसह बोट देखील पेटली आणि त्यात त्या खलाशाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अन्य खलाशी वाचण्यासाठी गेले असता गंभीर जखमी झाले. सोबत मासेमारी नौकेला आग लागल्याने नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी देवगड पोलीस पंचनामा करत असून तपास करत आहेत.
मच्छिमारांमध्ये समुद्रात मासेमारी करण्याच्या हद्दीवरून वरून वाद आहे. मासेमारीच्या हद्दीवरून मच्छिमारांमध्ये अनेकदा मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. एलईडी आणि बुल नेट मासेमारी ही बेकायदेशीर असूनही मच्छीमार मासेमारी करीत असल्याने याचा फटका पारंपरिक मासेमारी करणारया मच्छीमारांना बसत आहे. त्यामुळे भविष्यात बेकायदेशीर मासेमारी करणारयांवर मत्स्य विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
मच्छीमारांमध्ये जोरदार हाणामारी
नोव्हेंबर महिन्यात मालवण-तळाशिल (Sindhudurg News) येथील भर समुद्रात पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि बोटीवरील साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी तळाशिल येथील 25 जणांवर मालवण पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळाशील समुद्रात रात्रीच्या अंधारात मच्छीमारांच्या दोन गटात संघर्ष झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद व प्रथमेश लाड यांच्या 'पीर सुलेमान' या नौका समुद्रात मासेमारी करत असताना तळाशिल येथील काही मच्छीमारांनी दोन्ही बोटींवर चढत बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बोटीवरील दोन मोबाईल सेट, वायरलेस सेट, दोन जी पी एस संच, दोन फिश फाइंडर, दोन बिनतारी संदेश यंत्रणा, बॅटरी तसेच मासेमारी साहित्य मिळून तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल घेऊन गेले.
हे ही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
