सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे सापडला पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ 'प्युमिस' दगड
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हयात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे.
Sindhudurg Latest News Update : सिंधुदुर्ग जिल्हयात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हा दगड सापडला. भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांना हा दगड दाखवला असता त्यांनी देखील हा दगड दुर्मिळ असून हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक असल्याचं सांगितलं, अशी माहिती सतीश लळीत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्रकिनाऱ्यावर सतीश लळीत यांना पाण्यावर तरंगणारा 'प्युमिस' हा दगड सापडला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर आपणाला वजनाने हलकी व पाण्यावर तरंगणारी वस्तु आढळली. ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक (व्हल्कॅनिक पोरस रॉक) आहे. हा आपल्या भागात अतिशय दुर्मिळ आहे. विशेषत: समुद्रात पाण्याखाली ज्वालामुखीचा विस्फोट होतो, तेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागातून लाव्हारस प्रचंड वेगाने आकाशात उंच फेकला जातो. या लाव्ह्यामध्ये अनेक प्रकारचे वायु असतात. वर गेलेला हा लाव्हा जेव्हा खाली येऊ लागतो, तेव्हा तो घट्ट होण्याची प्रक्रिया लगेचच सुरु होते. पाणी, कर्बवायु व अन्य वायुंचे विघटन, हवेचा दाब आणि अन्य बाबींमुळे हा लाव्हा घट्ट होऊन दगडात रुपांतरित होण्यापुर्वी त्यात असंख्य छिद्रे तयार होतात.
हा 'प्युमिस' दगड जगाच्या सर्व भागात विशेषत: समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया, जपान, न्युझीलंड, अफगाणिस्तान, सिरीया, इराण, रशिया, तुर्कस्तान, ग्रीस, इटली, हंगेरी, जर्मनी, आईसलँड, उत्तर व दक्षिण अमेरिका, केनिया, इथिओपिया, टांझानिया आदि देशांमध्ये हा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो. ज्या भागात जागृत ज्वालामुखींचे प्रमाण मोठे आहे, अशा अनेक देशांमध्ये याचा वापर औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. मात्र तो सिंधुदुर्गात एकच दगड कसा सापडला यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
#सिंधुदुर्ग जिल्हयात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हा दगड सापडला. pic.twitter.com/YH4RKZ6a0C
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 7, 2023
भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांना हा दगड दाखवला असता त्यांनी देखील हा दगड दुर्मिळ असून हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक असल्याचं सांगितलं, अशी माहिती सतीश लळीत यांनी दिली.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 7, 2023