मोठी बातमी : सिंधुदुर्ग जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली, सर्वात मोठा गुंता जवळपास सुटला!
Sindhudurg Foreign Woman Update : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातल्या सावंतवाडी (Sawantwadi) येथील जंगलात सापडलेल्या महिलेने आता धक्कादायक कबुली दिली आहे.
Sindhudurg Foreign Woman Update : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातल्या सावंतवाडी (Sawantwadi) येथील जंगलात सापडलेल्या महिलेने आता धक्कादायक कबुली दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला संपवण्यासाठी जंगलात आपल्या पतीने बांधून ठेवल्याचा बनाव केला होता. पण ऐनवेळी मला जीवन संपवणे चुकीचं असल्याचं वाटलं. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी मी आरडाओरडा केला. तसेच, माझं लग्नही झालेलं नाही. मी दहा वर्ष तामिळनाडूमध्ये वास्तव्याला होते. केवळ मानसिक आजारपणातून असं टोकाचं पाऊल उचलत बनाव रचल्याचा या महिलेने म्हटलं आहे. सध्या या महिलेवरती प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी (Ratnagiri) येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, जंगलात सापडलेल्या महिलेने सर्व बाबींचा उलगडा केलाय. त्यामुळे सर्वात मोठा गुंता जवळपास सुटलाय.
साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती
सिंधुदुर्ग जिल्हयातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात मूळ अमेरिकन महिलेला (Sindhudurg foreign woman) साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. प्रकृती ढासळलेल्या या महिलेला उपचारासाठी गोव्यात बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेसोबत घडलेल्या या अमानवी घटनेची गंभीर दखल आता अमेरिकन दूतावासाने घेतली होती. मात्र या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय.
पतीने डांबून ठेवले असल्याचा बनाव तिने रचला
सोनुर्ली–रोणापाल येथील जंगलात साखळदंडाने झाडाला लॉकने महिलेला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. तिने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोक त्याठिकाणी पोहोचले होते. महिला ओरडत असताना एका गुराख्याच्या हा प्रकार निदर्शनास आला होता. पोलिसांच्या मदतीने ललिता कायी कुमार एस. या अमेरिकन महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर मला माझ्या पतीने डांबून ठेवले असल्याचा बनाव तिने रचला. विशेष म्हणजे बोलता येत नसल्याने तिने बऱ्याच गोष्टी लिहून सांगितल्या होत्या.
महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये सापडले
सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या या महिलेकडे तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये रोख सापडले होते. पोलीस मोबाईच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न केला, त्यातून बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत. अमेरिकन दुतावासाने या प्रकाराची गंभीर दखल होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जोमाने फिरवण्यास सुरुवात केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या