एक्स्प्लोर

Mumbai Goa Highway Accident: आधी कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, मग जखमींना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही पेटली

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला (CAR) नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी झाल्याने या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला (Ambulance) संपर्क साधत बांदा येथील रुग्णवाहिका बोलवली. मात्र रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना (Ambulance Accident) रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण गोठणे येथील व्यापारी बांदा येथे खरेदीसाठी गेले होते. गणेशोत्सवासाठी होलसेलने फटाके व अन्य सामान घेऊन ते झाराप पत्रादेवी बायपासने मालवण कडे निघाले होते. मळगाव – नेमळे हद्दीवर आले असताना गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकावरून उडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या पलीकडे जाऊन शेतात कोसळली. या अपघातात लोचन पालंडे व संतोष परब यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक आचरेकर व झायलो गाडी चालक आणि विशाल हाटले हे गंभीर जखमी झाले. 

अपघातानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. बांदा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेतून जखमी दीपक आचरेकर व विशाल हाटले यांना उपचारसाठी रुग्णालयात नेत असताना मळगाव रेडकर वाडी येथे बायपासवर अचानकपणे रुग्णवाहिकेला आग लागली. गाडीने पेट घेतल्याने गाडीतून दोन्ही जखमींना तसेच चालक व वैद्यकीय अधिकारी महिला यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अचानकपणे गाडी सुरू होऊन दुभाजकावर जाऊन चढली. त्यानंतर रुग्णवाहिकेने अचानकपणे पेट घेतला. पेट घेतल्यानंतर रुग्णवाहिकेतील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भली मोठी आग लागली. अपघातानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी कोंडी झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या:

Kirit Somaiya Dapoli: साई रिसॉर्टवर सोमय्या पोहचलेच नाही, ग्रामपंचायतीच्या उत्तराने समाधान झाल्याचे दिलं स्पष्टीकरण
Pune-Panshet Accident News: पुणे-पानशेत मार्गावर भीषण अपघात; रिक्षा आणि कारच्या धडकेत एक गंभीर गखमी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget