एक्स्प्लोर

Bharat Gogawale VIDEO : नारायण राणेंनी मारामाऱ्या केल्या, जेलमध्ये गेले, मर्डर... सगळं केलं आणि एवढ्या उंचीवर पोहोचले : भरत गोगावले

Bharat Gogawale On Narayan Rane : भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे असं भरत गोगावले म्हणाले. पण आता भानगडीचे दिवस संपले असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं. 

सिंधुदुर्ग : शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहेत. सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. नारायण राणे यांना जवळून पाहिलं आहे. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वगैरे सगळं झालं असं भरत गोगावले म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे संपन्न झाली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही असं ते म्हणाले. 

निलेश राणेंना भानगडी करायची गरज नाही

भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे  जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.

भरत गोगावले म्हणाले की, "आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का? कोकणात आज आपला पक्ष नंबर एक आहे."

भरत गोगावले म्हणाले पुढे की, "आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असंही नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपाचा एक आमदार आहे. आम्हाला समजून घेतलं तर आम्ही समजून घेऊ. माझ्या खात्यात कोकणाला झुकत माप देऊ."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!
ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget