एक्स्प्लोर

भरत गोगावलेंनी फोन करुन शिंदे गटात प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं, मात्र....नेमकं काय म्हणाले वैभव नाईक

शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दसरा मेळाव्यादिवशी फोन करुन शिंदे शिवसेनेत प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केलं.

Vaibhav Naik : शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दसरा मेळाव्यादिवशी फोन करुन शिंदे शिवसेनेत प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं. निलेश राणेंचं (Nilesh Rane) नाव न घेता त्यांचा प्रवेश घेतला नाही असंही सांगितलं होतं. मात्र, मी स्वार्थासाठी तिकडे गेलो नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलं.  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर मला थांबावंस वाटलं होतं. मात्र, पराभवानंतर मला मी सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी असल्याची जाणीव झाली, म्हणूनच पुढे काम करायचं ठरवल्याचे  वैभव नाईक म्हणाले. 

माझ्या पराभवाचा दोष पैसे किंवा evm ला दिला नाही 

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. याबबत बोलताना वैभव नाईक म्हणाले की, माझ्या पराभवाचा दोष पैसे किंवा evm ला दिला नाही असे नाईक म्हणाले. मतदाना दिवशी विरोधक म्हणाले होते बटण दाबा आणि खात्यात 2100 जमा करुन घ्या. मात्र आता लाडक्या बहिणींना दिवाळीनंतर 2100 रुपये देणार असं म्हणाले होते. अद्याप दिले नाही. त्यामुळं याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवला पाहिजे असेही नाईक म्हणाले. 

आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु

दरम्यान, काल वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यामध्ये निलेश राणे यांना इशारा देखील दिली होता. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आमदार निलेश राणेंना (Nilesh Rane) दिला आहे. जर उगाच कोणी त्रास दिला तर माझ्या सोबत 72 हजार लोक आहेत, त्यांना घेऊन रस्त्यावर उतरु हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही वैभव नाईक म्हणाले. आपला पराभव कशामुळे झाला हे निकालादिवशी समजलं आहे. त्यामुळे आपण चिंतन करण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी ही बैठक घेतल्याचे वैभव नाईक (Vaibhav Naik ) म्हणाले. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. माझ्यासमोर राजकारणात, समाजकारणात यापुढे राहायचं की नाही हा प्रश्न होता. मी कारण न देता पराभव स्वीकारला. जो जिता वही सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. आता मला आमदार म्हणून हाक मारू नका तर वैभव नाईक म्हणून हाक मारा. आमदार हे पद आयुष्यभर मलाच भेटेल असा टीळा लावून कोणी येत नाही. आपल्या सोबत जी लोकं राहतील त्यांना घेऊन काम करायचा निश्चय केला. माझ्या पराभवाने राज्यातील अनेक लोक हळहळले, त्यांनी अनेकांनी फोन केले, हाच माझा विजय असल्याचे नाईक म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

माझ्यासोबत 72 हजार लोक, कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर सर्वांना घेऊन रस्त्यावर उतरणार, वैभव नाईकांचा निलेश राणेंना इशारा

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
Embed widget