Agriculture News : तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव, 70 टक्क्यांहून अधिक पिकाची गळ; शेतकऱ्यांना आर्थिक फटका
तळकोकणात सुपारी पिकावर (Areca nut Crop) मोठ्या प्रमाणात गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं 70 टक्क्यांहून अधिक सुपारीची गळ झाली आहे.

Agriculture News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलाचा शेती पिकांवर (Ahriculture Crop) परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. तळकोकणात सुपारी पिकावर (Areca nut Crop) मोठ्या प्रमाणात गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं 70 टक्क्यांहून अधिक सुपारीची गळ झाली आहे. याचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
गळ लागलेल्या सुपारीला योग्य दर नाही, सुपारी फेकून देण्याची वेळ
तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याा सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सुपारीचे मोठे उत्पादन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यात सर्वाधिक सुपारीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. याच ठिकाणी 70 टक्क्याहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण बिघडलं
गळून पडलेल्या सुपारीला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. सर्वाधिक सुपारीचे उत्पादन हे दोडामार्ग तालुक्यात घेतलं जाते. त्यामुळं दोडामार्ग तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण बिघडलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधा बाजारपेठ ही सुपारीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी 50 हजार किलो सुपारीची विक्री झाली आहे. तर एक ते दीड लाख किलो सुपारीची विक्री ही शेजारील गोवा राज्यात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : हवामानातील बदलाचा शेती पिकांना फटका, उत्पादनात घट होणार; शेतकरी चिंतेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
