एक्स्प्लोर

....किमान आता तरी CM फडणवीसांनी महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेबाची कबर कायमची हटवावी; शंकराचार्य प्रज्ञानानंद महाराजांची मागणी, वादाला नव्याने उकळी

Shankaracharya Pragyanand : महाराष्ट्रातून औरंगजची कबर सरकार हटवणार नसेल तर सनातन हिंदू धर्मियांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी दिला आहे.

Shankaracharya Pragyanand Saraswati : ज्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्या हिंदू धर्माच्या अनुयायींना त्यांचा धर्म विचारून मारले जात आहे, हे दुर्दैवी असून याचा विचार केला पाहिजे. असे मत शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Pragyanand Saraswati) यांनी व्यक्त केले आहे. पहलगाम  (Pahalgam Terrorist Attack) मधील घटना थेट धर्मावर हल्ला असून ज्या हिंदू धर्मामुळे भारत भूमी ओळखली जाते, त्या हिंदू धर्मावर हा हल्ला असल्याचे ही शंकराचार्य म्हणाले. 

ज्या औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्याच औरंगजेबचे वंशज आज कट्टरपंथी आणि दहशतवादी म्हणून हिंदू धर्मियांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेब ची कबर कायमची हटवावी. जर महाराष्ट्रातून औरंगजची कबर सरकार हटवणार नसेल तर सनातन हिंदू धर्मियांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. ते नागपूर येथे बोलत होते. पहलगाममध्ये हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याशी आम्हाला सूड नको, तर त्यांना दंड द्यायचा आहे. सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा ही आमची अपेक्षा असल्याची शंकराचार्य म्हणाले.

....त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला- शंकराचार्य

दरम्यान, जे नेते पहलगाम मधील दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असे खोटे दावे करत आहे, मुळात त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला आहे असे सांगत शंकराचार्य यांनी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांचाही चांगलाच समाचार घेतला.काही मतांसाठी असे नेते धार्मिक दहशतवादाला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही, तर सरकारसोबत उभे राहण्याची आहे. असे ही ते म्हणाले.

प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं- स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

दरम्यान, याच विषयावर बोलतांना जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही मोठं वक्तव्य करून या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं असा संदेश पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं दिला आहे. गरज भासल्यास हिंदूंनी शस्त्र, शास्त्राचा अभ्यास करावा. वेळ पडल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी शस्त्र बाळगावीत, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget