'आदित्य ठाकरेंचे वक्तव्य हास्यास्पद, पुढील काळात ठाकरे गटाची स्थिती आणखी बिकट होणार' : शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार असल्याचे आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले. यावरून शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.
Shambhuraj Desai on Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना थेट आव्हान दिले. तुम्ही राजीनामा द्या, मी तुमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी समाचार घेतला आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, काल आदित्य ठाकरे यांची कोपरा सभा झाली. खूपच धाडसी विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आश्चर्यकारक विधान उबाठा गटाचे युवराज यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या चार कोपरा सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. आदित्य यांना जिंकण्यासाठी दोन विधान परिषदेच्या जागा द्याव्या लागत आणि नंतर निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच आहे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
ठाकरे गटाची परिस्थिती बिकट होणार
ठाकरे गटाची पुढील काळात आणि बिकट स्थिती होणार आहे. शिंदेची ठाणे नव्हे तर महाराष्ट्रात लोकप्रियता आहे. आदित्य ठाकरे आरोप करतात आमवस्या पौर्णिमेळा रात्री शेती करतात, मला आदित्य यांना सांगायचे तुम्ही शेती पाहायला जावे, आदित्य यांनी सवड काढून पाहा, जे शेतात कधीच जात नाही त्यांनी पाहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्या केवळ गटनेत्यांना बोलायला देण्याची शक्यता
उद्या मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी (Maratha Reservation) विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. याचे कामकाज कसं असेल? याबाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्या राज्यपालांचे भाषण होईल. त्यानंतर 15 मिनिटं ब्रेक होईल. त्यानंतर विधानसभा कामकाज सुरू होईल. एक तासाने विधानपरिषद कामकाज सुरू होईल. कदाचित केवळ गटनेत्यांना बोलायला दिले जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हाणाले शंभूराज देसाई?
पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. यावर शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण कुणाच्या भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी. परंतु काही जणांच्या काम करण्याची स्टाईल आक्रमक असते, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा